Shreyas Talpade Statement : अभिनेता श्रेयस तळपदे कायदाच्या कचाट्यात अडकला असल्याची कालपासून चर्चा रंगली होती. उत्तर प्रदेशात त्याच्यावर आणि आणखी एका व्यक्तीविरूद्ध फसवणूकीचे नवीन प्रकरण नोंदवले गेले आहे. हे आरोप चिट फंड घोटाळ्याच्या कोटी रुपयांच्या घोटाळ्याशी संबंधित आहे. श्रेयसविरोधात आर्थिक फसवणूक केल्याच्या आरोपातून गुन्हा दाखल करण्यात आला होता. उत्तर प्रदेशातील ग्रामस्थांना गुंतवणुकीवर रक्कम दुप्पट करून देण्याची योजना सांगण्यात आली होती. मात्र, ग्रामस्थांकडून पैसे घेऊन कंपनीचे एजंट लोक अचानक गायब झाल्यानंतर लोकांनी तक्रार दाखल केली. हे प्रकरण चर्चेत असताना श्रेयस तळपदेचा काहीही संबंध नसल्याचे त्याच्या टीमने सांगितलं आहे.
श्रेयस तळपदेच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटद्वारे याबद्दलची माहिती देण्यात आली होती. अभिनेत्याच्या टीमकडून याप्रकरणी निवेदन जरी करण्यात आले आहे. या निवेदनात नेमकं काय म्हटलं आहे? चला जाणून घेऊ… श्रेयसच्या टीमने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असं म्हटलं आहे की, “आजच्या जगात एखाद्या व्यक्तीने कष्टाने मिळवलेली प्रतिष्ठा निराधार अफवांमुळे अनावश्यकपणे कलंकित होते. हे अत्यंत दुर्दैवी आहे. श्रेयस तळपदे यांच्यावर फसवणूक किंवा गैरवर्तनाचा आरोप करणारे सर्व वृत्त पूर्णपणे खोटे आणि निराधार आहेत”.
आणखी वाचा – ‘देवमाणूस’ चित्रपटातून नेहा शितोळेचे लेखन क्षेत्रात पदार्पण, अभिनेत्रीची नव्या इनिंगला सुरुवात
पुढे त्यांनी असं म्हटलं आहे की, “एक सार्वजनिक व्यक्तिमत्व म्हणून, इतर अनेक सेलिब्रिटींप्रमाणे श्रेयस तळपदे यांना वारंवार विविध कॉर्पोरेट आणि वार्षिक कार्यक्रमांना आमंत्रित केले जाते, ज्यात ते उपस्थित राहतात. अशा उपस्थितीव्यतिरिक्त, त्यांचा संबंधित कंपनीशी कोणताही संबंध नाही. त्यामुळे त्यांच्यावरील आरोप आणि प्रसारित होणाऱ्या फसव्या किंवा बेकायदेशीर कृत्यांशी त्यांचा कोणताही संबंध नाही”.
आणखी वाचा – अंतराळात महिला अंतराळवीर सॅनिटरी नॅपकिन्स वापरतात का?, मासिक पाळीदरम्यान ‘त्या’ काय करतात?, नेमकं खरं काय…
यापुढे त्यांनी असंही म्हटलं आहे की, “आम्ही सर्वांना विनंती करतो की, त्यांनी चुकीची माहिती पसरवण्यापूर्वी तथ्ये पडताळून पहावीत आणि श्रेयस तळपदे यांचे नाव या निराधार अफवांपासून दूर ठेवावे. श्रेयस तळपदे कायद्याचे पालन करणारे नागरिक आहेत. तसेच प्रामाणिकपणा आणि व्यावसायिकतेचा सर्वोच्च मान राखण्यासाठी ते कायमच वचनबद्ध असतात.”