शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : सासरी भजन सुरू असलेलं पाहून मुग्धा वैशंपायनला राहवेना, अंदमानमध्ये असताना घराची ओढ अन्…; म्हणाली, “तिथे…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 26, 2024 | 11:38 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Mugdha vaishampayan says she is missing prathamesh laghate in andman with sharing video see the details

Video : सासरी भजन सुरू असलेलं पाहून मुग्धा वैशंपायनला राहवेना, अंदमानमध्ये असताना घराची ओढ अन्…; म्हणाली, "तिथे…"

गायक प्रथमेश लघाटे व गायिका मुग्धा वैशंमपायन हे दोघे गेले अनेक दिवस चांगलेच चर्चेत आहेत. दोघांनी लग्न केल्यापासूण् सोशल मीडियावर त्यांच्याविषयी अनेक चर्चा रंगताना पाहायला मिळत आहे. लग्नातील विधी व पारंपरिक लुकमुळे दोघेही चांगलेच चर्चेत आले आहेत. त्याचबरोबर लग्नातील साधेपणाने दोघांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अशातच नुकताच त्यांच्या लग्नाला १ महिना पूर्ण झाला आणि या १ महिन्याच्या पूर्ततेनिमित्त त्यांनी त्यांच्या लग्नाच्या खास क्षणांचा एक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर शेअर केला होता.

प्रथमेश-मुग्धा दोघेही सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. दोघे त्यांच्या कार्यक्रमाविषयी तसेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासंबंधितही काही अपडेट्स चाहत्यांना देत असतात. दोघे त्यांच्या गाण्याचे काही व्हिडीओदेखील चाहत्यांबरोबर शेअर करत असतात आणि त्या दोघांची केमिस्ट्रीदेखील चाहत्यांना खूपच आवडते. अशातच मुग्धाने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याद्वारे तिने तिला प्रथमेशची आठवण येत असल्याचे म्हटले आहे.

View this post on Instagram

A post shared by Marathi Celeb's Katta (@marathicelebkatta)

आणखी वाचा – “नाट्यगृह स्वच्छ ठेवणे…”, नाट्यगृहाच्या अस्वच्छतेबाबत प्रिया बापटचा संताप, म्हणाली, “ही साधी गोष्ट…”

सध्या मुग्धा गायनाच्या कार्यक्रमासाठी अंदमान येथे गेली आहे. अंदमान येथील अनेक व्हिडीओ, फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे शेअर करत आहे. तसेच अंदमान येथे ती प्रथमेशला मिस करत असल्याचं पाहायला मिळत आहे. नुकतीच तिने तशी एक स्टोरीदेखील पोस्ट केली होती. अशातच आता तिने पुन्हा एकदा प्रथमेशचा एक व्हिडीओ शेअर करत तिला अंदमानात त्याची उणीव भासत असल्याचे म्हटले आहे.

आणखी वाचा – बायकोचा एकटेपणा प्रथमेश लघाटेलाही सहन होईना, अंदमानला गेल्यानंतर आठवणीत भावुक, म्हणाला, “मी पण…”

मुग्धाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात प्रथमेश त्याच्या गावी भजनात दंग झाला असल्याचे पाहायला मिळत आहे आणि हाच व्हिडीओ शेयर करत तिने असे म्हटले आहे की, “तिथे असणं हे मी मिस करत आहे”. मुग्धाची ही स्टोरी रिपोस्ट करत प्रथमेशदेखील मुग्धाला मिस करत असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, प्रथमेश एका कार्यक्रमानिमित्त इंदोरला गेला होता. या त्याच्या इंदोरच्या प्रवासात त्याच्याबरोबर मुग्धा नसल्याने त्याला तिची आठवण येत असल्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या.

Tags: entertainment newsmarathi entertainment newsMarathi newsmarathi singermugdha vaishampayanprathamesh laghateप्रथमेश लघाटेमनोरंजन बातमीमराठी गायकमराठी बातमीमराठी मनोरंजन बातमीमुग्धा वैशंमपायन
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Humidity Infections Summer health issues
Lifestyle

आजकाल तुम्हालाही ताप आणि पोटदुखीचा त्रास होतोय का?, असे होण्यामागचं कारण आहे…

एप्रिल 18, 2026 | 9:50 am
patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Next Post
Actress Prajakta Mali questions Sri Sri Ravi Shankar on loneliness in the life of an artist see the details

“कलाकार इतरांना आनंद देतो पण...”, आयुष्यातील एकाकीपणावर प्राजक्ता माळीचा श्री श्री रविशंकर यांना प्रश्न, म्हणाली, “पुढे जाण्यासाठी...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.