मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता, कवी आणि उत्तम सूत्रसंचालक म्हणून लोकप्रिय असलेला अभिनेता म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. आपल्या कलागुणांमुळे अल्पावधीतच तो लोकप्रिय झाला. नाटक, मालिका आणि टेलिव्हिजन शो अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांची मनं जिंकणारा संकर्षण सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतो. संकर्षण त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे अनेक पोस्ट शेअर करत असतो. लेखक व कवी असल्यामुळे त्याच्या पोस्टचे कॅप्शन्स लक्ष वेधून घेतात. अशातच संकर्षणने त्याच्या भावासाठी एक खास सोशल मीडिया पोस्ट लिहिली आहे. संकर्षणने त्याच्या भावाच्या वाढदिवसानिमित्त ही पोस्ट शेअर केली आहे. (Sankarshan Karhade Brother New Work)
संकर्षणने इन्स्टाग्राम अकाऊंटवर भावाचा एक जुना आणि एक नवीन फोटो पोस्ट केला आहे आणि या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने भावाविषयी असं म्हटलं आहे की, “रोज सकाळी ५.३० वा. उठायचं, जीम ट्रेनरला एकवेळ व्यायामाचा कंटाळा आला तर त्याच्या वाटणीचे डंबेल्स उचलून घरी यायचं, आल्यावर कसल्या कसल्या स्मुदी, शेक प्यायचं, ठरल्यावेळीच, ठरलेलंच जेवायचं आणि ठरल्यावेळीच झोपायचं. माझ्याशी, माझ्या वागण्याशी, माझ्या सवयींशी एकही गोष्ट न जुळणारा हा माझा सख्खा भाऊ. पण आमच्यात एक समान आवड आहे ती म्हणजे अभिनयाची”.
आणखी वाचा – ‘आई कुठे काय करते’चा रिमेक येणार?, मालिका शेवटाकडे असताना दिग्दर्शकांचं भाष्य, म्हणाले, “रिमेक करायला…”
यापुढे संकर्षनने असं म्हटलं आहे की, “माझा भाऊ सतत धडपडत, कामाच्या शोधांत असतो आणि त्याला एक छान संधी मिळाली आहे. ‘झी मराठी’वरच्या ‘लाखांत एक आमचा दादा’ या मालिकेत तो पिंट्या उर्फ समीर निकम ही भूमिका करणार आहे. आजपासून रात्री ८.३० वाजता”. तसंच यापुढे संकर्षणने त्याच्या भावाला वाढदिवासाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत “तुमचेही आशीर्वाद व शुभेच्छा असुद्या” असं म्हटलं आहे.
आणखी वाचा – “भाऊ मुस्लिम, वडील ख्रिश्चन अन्…”; धर्माबाबत बोलला विक्रांत मेस्सी, म्हणाला, “तरीही लक्ष्मीपूजा करुन…”
दरम्यान, संकर्षण कऱ्हाडेच्या भावाचे नाव अधोक्षज कऱ्हाडे असं आहे. बालपणापासून दोघे नाटकांमध्ये काम करत आहे. अधोक्षज झी मराठीवरील ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या रिऍलिटी शोमध्ये सहभागी झाला होता. त्यानंतर तो झीवरील ‘घेतला वसा टाकू नको’ या मालिकेत दिसला होता. अशातच ‘लाखांत एक आमचा दादा’ या मालिकेतील नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.