शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

संकर्षण कऱ्हाडेच्या ‘तू म्हणशील तसं’ नाटकाचा शेवट, निरोप घेताच अभिनेता भावुक, म्हणाला, “तुमच्या मनांत…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 25, 2025 | 12:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
 Sankarshan Karhade Emotional

संकर्षण कऱ्हाडेच्या 'तू म्हणशील तसं' नाटकाचा शेवट, निरोप घेताच अभिनेता भावुक, म्हणाला, "तुमच्या मनांत…"

 Sankarshan Karhade Emotional : अभिनेता, लेखक, सूत्रसंचालक या तीनही जबाबदाऱ्या पेलवत अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने रसिकांच्या मनात घर केलं. नाटक, मालिकांमधून संकर्षणने नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. सोशल मीडियावरही संकर्षण बऱ्यापैकी सक्रिय असतो. नेहमीच तो काही ना काही अपडेट शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. नेहमीच तो त्याच्या डेली रुटीनमधील खास प्रसंग, विविध अनुभव चाहत्यांसह शेअर करतो. सध्या संकर्षण रंगभूमीकडे वळला आहे. त्याची अनेक नाटक रसिकांचं भरभरुन मनोरंजन करत आहेत. अशातच संकर्षणने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर भावुक पोस्ट शेअर केली.

संकर्षणने लिहिलेल्या पहिल्या नाटकाचा शेवटचा प्रयोग झाला त्यानिमित्त अभिनेत्याने भावुक पोस्ट लिहिली. इतकंच नाहीतर संकर्षणने त्याच्या नाटकाचा शेवटचा प्रयोग हाऊसफुल्ल झाल्याचंही सांगितलं. संकर्षणने पोस्ट शेअर करत म्हटलं, “नमस्कार. सुप्रभात. काल #तूम्हणशीलतसं नाटकाचा शेवटचा प्रयोग बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे पार पडला. प्रेक्षकांनी नाटकाला हाऊसफुल्ल निरोप दिला. त्या निमित्ताने काही लिहिलंय ते शेअर करतो. कसं वाटतंय सांगा”.

आणखी वाचा – कोयता घेऊन अंगावर धावले, बेशुद्ध होईपर्यंत मारलं आणि…; ज्येष्ठ अभिनेत्रीचा वडिलांबाबत खुलासा, म्हणाल्या, “लागलेलं असताना…”

माझ्यातल्या लेखकाचं दोन हजार, चौदाला लगीन झालं
‘लेखणी’ नावाच्या बायकोपासून, मला हे पहिलं बाळ झालं…

म्हणलं नाव असं ठेऊ, की होणार नाही हसं
सर्वानुमते ठरलं मग, ‘तू म्हणशीलतसं’…

कलाकृतीचा बाप होऊन, या क्षेत्रांत थोडीच भागतं ???
निर्माता नाव्याच्या काकाकडे, त्याला दत्तक द्यावं लागतं…

चांगला काका शोधण्याचे, सगळे प्रयत्नं संपले
अचानक काका मिळाले हो… प्रशांत पुरषोत्तम दामले…

View this post on Instagram

A post shared by Sankarshann G Karhade (@sankarshankarhade)

मग ‘प्रसाद’ नावाच्या मास्तराला, संस्कारांसाठी बोलवलं
सगळ्यांनी मिळून हे बाळ चांगलं, ४५० प्रयोग चालवलं…

पण आज मात्रं बापाचं काळीज, आतून खूप हाललंय
माझं पहिलं बाळ मला सोडून, लांब कुठेतरी चाललंय…

आणखी वाचा – आणखी वाचा – “तिची जागा कोणीही घेऊ शकत नाही”, पूर्णा आजीच्या रिप्लेसमेंटबाबत अर्जुनचा खुलासा, म्हणाला, “हा निर्णय…”

नाटकाला गच्चं पकडून ठेवाव, असं होत नसतं हो,
प्रत्येक जीवाप्रमाणे नाटकाचंही, ठरलेलं आयुष्यं असतं हो…

एक विनंती तुम्हाला करतो, जरा समजुन घ्याल का ?
या कलाकृतीतला तुमच्या, मनांत जिवंत ठेवाल का…?

आग्रह नाही हं मुळी, वाटलं तर ठेवा बरं
मोबदला म्हणून तुम्हाला देतो वचन खरं…

‘तथास्तु’ म्हणा ह्या वाक्याला, जे पुढे आता बोलीन
लेखणी सोबतच्या संसारात पुढेही , चांगली पोरं जन्माला घालीन…!!!

संकर्षणने ही पोस्ट शेअर करत प्रशांत दामले, प्रसाद ओक, कलाकार आणि प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. सध्या संकर्षणच ‘कुटुंब किर्रतन’ हे नाटक रंगभूमीवर धुमाकूळ घालतंय.

Tags: marathi actorsankarshan karhadeSankarshan Karhade Emotional
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Parineeti Chopra Pregnancy

परिणीती चोप्रा व राघव चड्ढा आई-बाबा होणार, लग्नाच्या दोन वर्षानंतर गुडन्यूज, शेअर केली खास पोस्ट

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.