शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

परिणीती चोप्रा व राघव चड्ढा आई-बाबा होणार, लग्नाच्या दोन वर्षानंतर गुडन्यूज, शेअर केली खास पोस्ट

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 25, 2025 | 12:53 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Parineeti Chopra Pregnancy

परिणीती चोप्रा व राघव चड्ढा आई-बाबा होणार, लग्नाच्या दोन वर्षानंतर गुडन्यूज, शेअर केली खास पोस्ट

Parineeti Chopra Pregnancy : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा ही जोडी लोकप्रिय जोडींपैकी एक आहे. २४ सप्टेंबर २०२३ ला अगदी शाही थाटामाटात ही जोडी लग्नबंधनात अडकली. तेव्हापासून या जोडीचे लाखो चाहते दिवाने आहेत. परिणीतीने आजवर तिच्या अभिनयाने रसिकांच्या मनावर राज्य केलं आहे. सोशल मीडियावरही ती बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. अशातच परिणीतीने चाहत्यांसह एक गुडन्यूज शेअर केली आहे. लग्नाच्या दीड वर्षानंतर परिणीती आई होणार आहे. सोशल मीडिया पोस्ट शेअर करत तिने ही आनंदाची बातमी दिली आहे.

परिणीती चोप्राने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये तिने, “आमचे छोटेसे जग… त्याच्या मार्गावर” असे लिहिले आहे. तसेच या पोस्टमध्ये परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा पाठमोरे चालताना दिसत आहेत. याचबरोबर तिने एक फोटो शेअर केला आहे सुंदर अशा एक केकवर १+१ = ३, असं लिहीत त्यावर चिमुकली पावलं पाहायला मिळत आहेत. परिणीती चोप्राची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. या गुड न्यूजनंतर चाहते तिचे अभिनंदन करताना दिसत आहेत.

आणखी वाचा – देवदत्त नागेंचा ‘जय मल्हार’ मालिकेतील आठवणींना उजाळा, जेजुरीत नवं घर घेण्याचं स्वप्नही पूर्ण, म्हणाले…

View this post on Instagram

A post shared by @parineetichopra

परिणीती आणि राघव यांनी आई-बाबा होणार असल्याची आनंदाची बातमी देताच त्यांच्यावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे. तसेच चाहत्यांमध्येही आनंदाचं वातावरण पसरलेलं पाहायला मिळत आहे. या पोस्टवर राकुल प्रीत, अनन्या पांडे, सोनम कपूर, नेहा धुपिया, रकुल प्रीत, भूमी पेडनेकर यांच्यासारख्या अनेक सेलिब्रिटींनी अभिनेत्रीचे अभिनंदन केले आहे.

आणखी वाचा – संकर्षण कऱ्हाडेच्या ‘तू म्हणशील तसं’ नाटकाचा शेवट, निरोप घेताच अभिनेता भावुक, म्हणाला, “तुमच्या मनांत…”

यापूर्वी परिणीती तिच्या गरोदरपणाबाबत कपिल शर्माच्या शोवर बोलली होती. परिणीती राघवला कपिलने असा प्रश्न केला होता की, तुम्ही बेबी प्लॅन कधी करताय? त्यावर दोघांनी दिलेल्या उत्तराकडे साऱ्यांच लक्ष वेधलं. राघव हसत म्हणाला की, “देऊ… तुम्हा सर्वांना लवकरच आम्ही आनंदाची बातमी देऊ”, हे ऐकून परिणीती थोडीशी शॉक झाली. आणि ती आश्चर्याने राघवकडे पाहू लागली. आणि नंतर परिणीतीलाही हसू अनावर झालं.

Tags: bollywood actressParineeti ChopraParineeti Chopra pregnent
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Devoleena Bhattacharjee trolling

एक आई म्हणून देवोलिना भट्टाचार्जीचा संताप अनावर, लेकाच्या रंगावरुन ट्रोल करणाऱ्यांवर पुन्हा भडकली, म्हणाली, "कट्टर सनातनी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.