मंगळवार, सप्टेंबर 1, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कोल्हापुरी मिसळीवरून केलेल्या संकर्षण कऱ्हाडेच्या कवितेने वेधलं लक्ष, म्हणाला, “तुला पाहिलं की…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 20, 2023 | 6:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sankarshan Karhade Post

कोल्हापुरी मिसळीवरून केलेल्या संकर्षण कऱ्हाडेच्या कवितेने वेधलं लक्ष, म्हणाला, "तुला पाहिलं की..."

नाटक, मालिका, चित्रपट या तीनही क्षेत्रात काम करून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेला अभिनेता म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. अभिनय क्षेत्रामुळे संकर्षण कऱ्हाडेला ओळख मिळाली असली तरी तो त्याच्या कवी मनाच्या स्वभावामुळे विशेष लोकप्रिय आहे. संकर्षणने त्याच्या कवितांमधून स्वतःचा असा चाहतावर्ग निर्माण केला आहे. संकर्षण उत्तम कवी, अभिनेता आहेच शिवाय तो उत्तम निवेदकही आहे. विविध कार्यक्रमांचे निवेदन करताना तो दिसतो. (Sankarshan Karhade Post)

संकर्षण सध्या नाटकविश्वात बऱ्यापैकी सक्रिय असल्याचं पाहायला मिळतंय. सिनेक्षेत्रात मुशाफिरी करत असलेला संकर्षण सोशल मीडियावर देखील सक्रीय असतो. संकर्षण त्याच्या नवीन नवीन कामा संदर्भातील पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असतो, तसाच तो वैचारिक, काही मजेशीर तर कधी सामाजिक घडामोडींवर आधारीत पोस्टही शेअर करत असतो. शिवाय संकर्षण नेहमीच त्याच्या परदेश दौऱ्यादरम्यान आलेले अनुभवही सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतो.

आणखी वाचा – साडीमध्ये दिसणारी ‘आई कुठे काय करते’मधील मधुराणी प्रभुलकरने ड्रेसिंग स्टाइलसह संपूर्ण लूकच बदलला, सुकन्या मोने म्हणतात, “तू खूप…”

अशातच संकर्षणची सोशल मीडियावरील एक पोस्ट विशेष लक्षवेधी ठरतेय. तू म्हणशील तसं या नाटकाच्या दौऱ्यानिमित्त संकर्षण सध्या कोल्हापूर दौरा करण्यात व्यस्त आहे. बरं, यावेळी त्याने कोल्हापूरात कोल्हापूरच्या फेमस मिसळीचा आनंद लुटला आहे. कोल्हापूर येथे कोल्हापुरी मिसळ हा पदार्थ स्पेशल असून अनेकजण तिथे गेल्यावर मिसळीचा आनंद लुटतात. हा आनंद लुटण्याचा मोह अभिनेता संकर्षण कऱ्हाडेला ही आवरला नाही.

View this post on Instagram

A post shared by Sankarshan Karhade (@sankarshankarhade)

आणखी वाचा – परदेशात प्रसाद ओकचा लेक पदवीधर झाल्यानंतर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव, मराठी कलाकारही भारावले, म्हणाले, “आम्हाला तुझा…”

संकर्षणने याबाबतची पोस्ट शेअर करत, “कोल्हापूरातल्या मिसळीला मी म्हणलं, खाऊ का तुला? तुला पाहिलं की होतंय बघ कसं कसं, मिसळ म्हणाली, खा बाबा एकदाचा ‘तूम्हणशीलतसं'” असं म्हणत छान अशी कविता केली आहे. कोल्हापूरच्या मिसळीचं व संकर्षणच्या नाटकाचं अचूक समीकरण जुळवत त्याने केलेली ही खास पोस्ट साऱ्या रसिक प्रेक्षकांच्या नजरा वळवून घेत आहे.

Tags: entertainmentmarathi actorsankarshan karhadesankarshan karhade post
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Jayanti 2 Trailer
Entertainment

‘जयंती २’मधून उलगडणार कॉलेजमधील भेदभावाची गोष्ट, ट्रेलर पाहून वाढली उत्सुकता, ११ सप्टेंबरपासून जवळच्या सिनेमागृहात

ऑगस्ट 31, 2026 | 12:49 pm
Nikki Arbaaz breakup news
Entertainment

निक्की-अरबाजमध्ये नेमकं काय बिनसलं?, एकमेकांना अनफॉलो केलं अन्…; पोस्टमुळे चर्चांना उधाण

ऑगस्ट 31, 2026 | 10:22 am
Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Next Post
marathi actor gashmeer mahajani shared instagram story about amitabh bachchan secretly watched india vs australia final match

Ind VS Aus : अंतिम सामन्यावरून अभिनेता गश्मीर महाजनीचा अमिताभ बच्चन यांना टोमणा, म्हणाला, लपून मॅच पाहिली म्हणून…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.