शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : कतारमध्ये आइस्क्रीमवाल्याकडूनच संकर्षण कऱ्हाडेची फजिती, स्वतःलाच काय करावं ते सूचेना अन्…; व्हिडीओ व्हायरल

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 19, 2024 | 2:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
sankarshan karhade in doha

संकर्षण कऱ्हाडेचा व्हिडीओ व्हायरल

मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडे मालिका, नाटक यांसारख्या माध्यमातून घराघरात पोहोचला. त्याने आजवर त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. रंगभूमी गाजवणाऱ्या या अभिनेत्यांच्या यादीत संकर्षणचे नाव आवर्जून घेतले जाते. सध्या ‘नियम व अटी लागू’ या नाटकाचे प्रयोग सर्वत्र सुरु आहेत. या नाटकांना सर्वत्र या नाटकाची विशेष जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळत असून सध्या या नाटकाचे दौरे परदेशात सुरु असल्याचं दिसत आहे. या नाटकासाठी सध्या तो कतार येथे गेला असल्याची माहिती त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. (sankarshan karhade in doha)

दोहा येथे ‘नियम…’ची संपूर्ण टीम पोहोचली आहे. या नाटकाचे सर्वच प्रयोग यशस्वी झालेलेदेखील दिसून येत आहेत. संकर्षणची नाटकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका असून त्याचे चाहते आवर्जून या नाटकाला उपस्थिती लावतात. सोशल मीडियावर संकर्षण बऱ्यापैकी सक्रिय असलेलादेखील दिसून येतो. अभिनयाबरोबर तो लेखन, कविता यामुळेदेखील अधिक प्रसिद्ध असतो. सोशल मीडियावर त्याच्या कवितादेखील अधिक व्हायरल होतात. त्याच्या कविता ऐकण्यासाठी चाहते खूप उत्सुकदेखील असलेले पाहायला मिळतात.

आणखी वाचा – ओवसा, गणपतीसाठी कणकवलीमधील गावात नवरा व सासूला घेऊन गेली तितीक्षा तावडे, साधेपणा भावला, कोकणी स्टाइल उखाणाही चर्चेत

View this post on Instagram

A post shared by Sankarshan Karhade (@sankarshankarhade)

सोशल मीडियावरुन तो त्याच्या खासगी आयुष्यातील अनेक प्रसंग शेअर करताना दिसतो. सध्या दोहा येथे असून तिथे तो फिरताना दिसत आहे. त्याने काही फोटोदेखील शेअर केले आहेत. एका ठिकाणी उभा असलेला तो दिसत असून निळ्या रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची जीन्स परिधान केली आहे. तसेच त्याने इंन्स्टाग्राम स्टोरीवरदेखील एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याकडे सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे.

आणखी वाचा – वाईट शक्तीमुळे अभिनय क्षेत्रात आल्याचा सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा दावा, मुस्लिम मुलाशी लग्न केल्यानंतर म्हणाली, “अल्लाहने मला…”

संकर्षणचा जो व्हिडीओ समोर आला आहे यामध्ये तो एका आयस्क्रीमच्या गाडीच्या इथे दिसून येत आहे. तसेच आयस्क्रीम घेताना संकर्षणची किती तारांबळ उडाली हे बघायला मिळत आहे. तसेच हे करताना त्याच्या चेहऱ्यावरील हास्यदेखील खूप काही सांगून जात आहे. दरम्यान त्याच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर तो ‘तु म्हणशील तसं’ तसेच स्पृहा जोशीबरोबरदेखील कवितांचे कार्यक्रम करताना दिसून येतो. सध्या तो ‘ड्रामा ज्युनिअर्स’ कार्यक्रमात परीक्षक म्हणून काम पाहत आहे.    

Tags: dohaicecreamsankarshan karhade
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Amitabh Bachchan shared a video apologizing after saying a wrong Marathi word

Video : अमिताभ बच्चन बोलले चुकीचं मराठी, गायकाने दाखवून दिली चूक, माफी मागत पुन्हा मराठी बोलले आणि…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.