मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडे मालिका, नाटक यांसारख्या माध्यमातून घराघरात पोहोचला. त्याने आजवर त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. रंगभूमी गाजवणाऱ्या या अभिनेत्यांच्या यादीत संकर्षणचे नाव आवर्जून घेतले जाते. सध्या ‘नियम व अटी लागू’ या नाटकाचे प्रयोग सर्वत्र सुरु आहेत. या नाटकांना सर्वत्र या नाटकाची विशेष जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळत असून सध्या या नाटकाचे दौरे परदेशात सुरु असल्याचं दिसत आहे. या नाटकासाठी सध्या तो कतार येथे गेला असल्याची माहिती त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. (sankarshan karhade in doha)
दोहा येथे ‘नियम…’ची संपूर्ण टीम पोहोचली आहे. या नाटकाचे सर्वच प्रयोग यशस्वी झालेलेदेखील दिसून येत आहेत. संकर्षणची नाटकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका असून त्याचे चाहते आवर्जून या नाटकाला उपस्थिती लावतात. सोशल मीडियावर संकर्षण बऱ्यापैकी सक्रिय असलेलादेखील दिसून येतो. अभिनयाबरोबर तो लेखन, कविता यामुळेदेखील अधिक प्रसिद्ध असतो. सोशल मीडियावर त्याच्या कवितादेखील अधिक व्हायरल होतात. त्याच्या कविता ऐकण्यासाठी चाहते खूप उत्सुकदेखील असलेले पाहायला मिळतात.
सोशल मीडियावरुन तो त्याच्या खासगी आयुष्यातील अनेक प्रसंग शेअर करताना दिसतो. सध्या दोहा येथे असून तिथे तो फिरताना दिसत आहे. त्याने काही फोटोदेखील शेअर केले आहेत. एका ठिकाणी उभा असलेला तो दिसत असून निळ्या रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची जीन्स परिधान केली आहे. तसेच त्याने इंन्स्टाग्राम स्टोरीवरदेखील एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याकडे सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे.
संकर्षणचा जो व्हिडीओ समोर आला आहे यामध्ये तो एका आयस्क्रीमच्या गाडीच्या इथे दिसून येत आहे. तसेच आयस्क्रीम घेताना संकर्षणची किती तारांबळ उडाली हे बघायला मिळत आहे. तसेच हे करताना त्याच्या चेहऱ्यावरील हास्यदेखील खूप काही सांगून जात आहे. दरम्यान त्याच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर तो ‘तु म्हणशील तसं’ तसेच स्पृहा जोशीबरोबरदेखील कवितांचे कार्यक्रम करताना दिसून येतो. सध्या तो ‘ड्रामा ज्युनिअर्स’ कार्यक्रमात परीक्षक म्हणून काम पाहत आहे.