कलाकार मंडळी ही त्यांच्या प्रेक्षकांपर्यंत केवळ त्यांची कलाच नाही तर समाजातील अनेक विषयही पोहोचवत असतात. मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार मंडळी ही मराठी मातीशी जोडलेले आहेत. त्यामुळे अभिनयाबरोबरच हे कलाकार समाजातील काही असे घटना किंवा प्रसंगे पोहोचवतात जे अनेकांपर्यंत कधीच पोहोचत नाहीत. असेच काही घटना व प्रसंगे सोशल मीडियावर शेअर करणारा अभिनेता म्हणजे संदीप पाठक. मनोरंजन क्षेत्रामध्ये संदीप पाठक हा एक लोकप्रिय अभिनेता आहे. तो आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपटांमध्ये दिसून आला आहे. त्याने आतापर्यंत वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. (Sandeep Pathak Shared Old Man Video)
अभिनयाबरोरबच संदीप पाठक सोशल मीडियावरदेखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतो. अशातच त्यांचे नुकताच शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. संदीपने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक ८५ वर्षीय आजोबा देवी सप्तशृंगीचा गड चढत आहेत आणि अभिनेता त्यांची विचारपूस करत आहे. तसंच त्यानंतर तो त्या आजोबांच्या पाया पडत त्यांना नमस्कार करत त्यांचे आशीर्वादही घेतो.
या व्हिडीओमध्ये संदीप त्यांच्याशी संवाद साधताना असं म्हणतो की, “१९६७ सालापासून तुम्ही सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला येत आहात”. त्यावर ते आजोबाही म्हणतात की, “१९६७ सालापासून तुम्ही सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला येत आहे आणि वर्षातून किमान चार ते पाच वेळा येत आहे”. यावर संदीप त्यांना असं म्हणतो की, “या गडाला ५००-६००० पायऱ्या आहेत, तर इतक्या पायऱ्या तुम्ही चढता का?” यावर आजोबाही आहो हजार असुद्या त्याने काय होत नाही. मी बसतही नाही. उभा राहूच विश्रांती घेतो आणि मग पुन्हा चढतो”. पुढे संदीप त्यांना रोप-वेने जाण्याबद्दल सुचवतो. मात्र ते आजोबा त्यालाही नाही म्हणतात. या व्हिडीओमध्ये आजोबांचा या वयातला उत्साह पाहून संदीप भारावून जातो.
दरम्यान, संदीपच्या या व्हिडीओला अनेकांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसंच अभिनेत्याचे व त्याच्या साधेपणाचे अनेकांनी कौतुकही केलं आहे. “जुनी माणसं ही शेवटची पिढी जी खूप कमी गोष्टी मध्ये समाधानी आहे पुन्हा असे माणसं मिळणार नाही”, “सकाळी सकाळी सुंदर आणि ‘समाधान’ देणारा व्हिडीओ आहे हा”, “समाधान ‘ होत नाही, अंगावर काटा आला, नतमस्तक”, “हीच आपली संस्कृती आणि हाच आपला ठेवा. किती कौतुक करावं आजोबांचं. खरंच या वयात इतकी जिद्द आणि प्रेम” अशा अनेक कमेंट्स करत चाहत्यांनी या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे.