Amruta Deshmukh And Prasad Jawade : टेलिव्हिजन विश्वात लोकप्रिय असणाऱ्या जोडप्यांपैकी एक जोडी म्हणजे अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे. १८ नोव्हेंबर २०२३ ला दोघांनी लग्नगाठ बांधली. पुण्यात अगदी शाही थाटामाटात या जोडीने त्यांचा लग्नसोहळा पार पाडला. अमृता-प्रसाद यांच्या लग्नाला मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यांची जोडी प्रेक्षकांची लाडकी जोडी आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात या दोघांमध्ये घट्ट मैत्री पाहायला मिळाली होती. या शोमध्येदेखील त्यांची जोडी प्रेक्षकांना आवडली होती. मात्र शोमध्ये असताना त्यांनी कोणतीच कबुली दिली नाही. शोमधून बाहेर आल्यानंतर थेट साखरपुड्याचे फोटो शेअर करत त्यांनी लग्न करणार असल्याचं सांगितलं. लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर चाहत्यांनी आनंद व्यक्त केला होता. आता त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं आहे.
लग्नाचा पहिला वाढदिवस प्रत्येक नवविवाहित जोडप्यासाठी खास असतो. याच खास दिवसाचे औचित्य साधत प्रसाद-अमृता यांनी त्यांच्या लग्नाचा खास व्हिडीओ शेअर करत एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त केले. इतकंच नाही तर अमृता व प्रसाद यांनी त्यांचा लग्नाचा पहिला वाढदिवस खास पद्धतीने साजरा केला. सध्या प्रसाद पारू या मालिकेमुळे घरापासून दूर सातारा येथे राहत आहे. अधूनमधून तो त्याच्या घरी येत असतो वा अमृता नवऱ्याला भेटायला जात असते. आता देखील अमृता साताऱ्यात प्रसादला भेटायला गेली होती.
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त प्रसादने पांचगणीचा प्लॅन केला होता. दोन दिवसाचा छोटासा ब्रेक घेऊन प्रसाद व अमृता यांनी पांचगणी गाठलं. पांचगणीला प्रसादने खास हॉटेल बुक केलं होत, फुग्यांचा डेकोरेशन केलेली रुम त्याने सजवून घेतली होती. असं हे प्रसादने दिलेलं सरप्राईज अमृताला खूप आवडलं. दोघांनी पांचगणी येथे खूप एन्जॉय केलं. व्हिडीओमध्ये त्यांची ही छोटीशी ट्रिप ते एन्जॉय करताना दिसले. मात्र दोन दिवसांच्या सुट्टीनंतर ते लगेच कामावर परतले असल्याचंही त्यांनी व्हिडीओमध्ये म्हटलं.
दरम्यान, ‘बिग बॉस’ मराठीमध्ये झळकलेल्या अमृता देशमुखसह प्रसादने लग्न केले. प्रसादच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. लग्नानंतर प्रसादने लगेचच कामाला सुरुवात झाली. प्रसाद सध्या ‘पारू’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहे. या मालिकेचं चित्रीकरण सध्या सातारा येथे सुरु आहे. त्यामुळे साताऱ्यातचं प्रसादला राहावं लागत आहे. नेहमी मुंबई-पुणे प्रवास शक्य नसल्याने प्रसादने साताऱ्यातचं एक घर घेतलं असून तो तिथेच राहतो.