बॉलिवूड अभिनेता वरुण धवन सध्या खूप चर्चेत आहे. ३ जून २०२४ रोजी नताशाने एका सुंदर व गोड मुलीला जन्म दिला. याबद्दल वरुणचे वडील व चिमुकलीचे आजोबा डेव्हिड धवन यांनी माहिती दिली. वरुण व नताशा यांनी त्यांच्या लेकीचे नाव लारा असे ठेवले. दरम्यान मुलीच्या जन्मानंतर घरी घेऊन जाताना वरुणचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. मात्र त्यावेळी मुलीचा चेहरा दिसून आला नव्हता. अशातच आता वरुण नताशाचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये वरुणच्या लेकीची पहिली झलक बघायला मिळत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (varun dhawan daughter first look)
बॉलिवूडमधील अनेक कलाकार सध्या नवीन वर्षांचे सेलिब्रेशन करण्यासाठी मुंबईबाहेर जाताना दिसत आहेत. आलिया व रणबीर यांच्या लेकीचा व्हिडीओ व्हायरल होत असतानाच वरुणच्या लेकीलादेखील पहिल्यांदाच बघायला मिळाले आहे. दरम्यान वरुण व नताशा दिसून येत आहेत. नताशाने चॉकलेटी रंगाचा कॅज्युअल ड्रेस परिधान केला आहे. तसेच तिच्याकडे मुलगी होती. मुलीला त्यांनी पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता.
तसेच समोर आलेल्या व्हिडीओमध्ये मुलगी जागी असून टकमक बघताना दिसत आहे. नताशा व लारा यांना वरुण सांभाळताना दिसत आहे. वरुणची मुलगी खूपच गोड दिसत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले की, “ही अगदी नताशासारखी दिसत आहे”, तसेच दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, “खूप गोड दिसत आहे”. दरम्यान मुलीच्या जन्मानंतर आयुष्य पूर्णपणे बदलले असल्याचेही वरुणने सांगितले आहे.
वरुण व नताशा हे दोघंही २४ जानेवारी २०२१ साली लग्नबंधनात अडकले. नंतर जून २०२४ मध्ये आई-वडील झाले. त्यांची मुलीचं नाव लारा असं ठेवलं. फेब्रुवारी महिन्यात त्यांनी आई-वडील होणार असल्याची घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून केली होती. सध्या वरुणच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, आता तो ‘बेबी जॉन’ या चित्रपटात दिसून आला होता. यामध्ये त्याच्याबरोबर कीर्ती सुरेश, वामिका गब्बी, सान्या मल्होत्रा व जॅक श्रॉफ हे कलाकार काम करताना दिसले.