सोमवार, मे 19, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अक्षय कुमार, शाहरुख खान व अजय देवगणला केंद्र सरकारकडून नोटीस; पान मसाल्याच्या जाहिरातीचं प्रकरण पडलं महागात

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 11, 2023 | 1:06 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
ShahRukh Khan Akshay Kumar Ajay Devgn HC Notice

अक्षय कुमार, शाहरुख खान व अजय देवगणला केंद्र सरकारकडून नोटीस; पान मसाल्याच्या जाहिरातीचं प्रकरण पडलं महागात

बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगण हे तीनही बॉलिवूडचे कलाकार एकत्र चर्चेत आले आहेत. बरं पण हे कोणत्या चित्रपटामुळे चर्चेत आले नसून त्यांचं चर्चेत येण्याचं कारण काही वेगळंच आहे. बॉलिवूडच्या या तीन अभिनेत्यांना केंद्र सरकारने नोटीस पाठवली असल्याचं समोर आलं आहे. आरोग्यासाठी घातक असलेल्या पान मसाल्याचा जाहिरात केल्याप्रकरणी त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. (ShahRukh Khan Akshay Kumar Ajay Devgn HC Notice)

आरोग्यासाठी घातक असलेल्या गुटखा व पान मसाल्याच्या जाहिरात केल्याप्रकरणी बॉलीवूड अभिनेते अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगण यांना केंद्र सरकारने नोटीस बजावल्या आहेत. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाच्या अवमानना याचिकेवरील सुनावणीदरम्यान केंद्र सरकारच्या वकिलांनी अभिनेत्यांना नोटीस पाठवली असल्याचं समोर आलं आहे.

आणखी वाचा – शाहरुख खानचा ‘डंकी’ व प्रभासच्या ‘सालार’ची बॉक्स ऑफिसवर होणार टक्कर, कोणत्या चित्रपटाला प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती मिळणार?

दरम्यान या प्रकरणावर सुप्रीम कोर्टातही सुनावणी सुरू आहे. त्यामुळे अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनऊ खंडपीठासमोर केलेली अवमानना याचिका फेटाळण्यात यावी, अशी मागणी केंद्र सरकारच्या वकिलांनी केली आहे. युक्तिवाद ऐकल्यानंतर खंडपीठाने सुनावणीची तारीख निश्चित केली आहे. ९ मे २०२४ रोजी ही सुनावणी करण्यात येणार आहे. २२ ऑक्टोबरला सरकारला निवेदन देण्यात आले होते. पण पुढे यावर काहीही कारवाई झाली नसल्याचा युक्तिवाद याचिकाकर्त्याने केला.

आणखी वाचा – Video : घरीच रितेश देशमुखने कापले मुलाचे केस, देशमुखांच्या सूनेने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत, तुम्ही पाहिलात का?

शुक्रवारी डेप्युटी सॉलिसिटर जनरल एसबी पांडे यांनी उच्च न्यायालयात यावरून भाष्य केले. ते म्हणाले. “केंद्राने अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगण यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. अमिताभ बच्चन यांनी यापूर्वीच आपला करार रद्द केला असूनही त्याची जाहिरात दाखवणाऱ्या गुटखा कंपनीला कायदेशीर नोटीस पाठवली होती, असेही न्यायालयाला सांगण्यात आले” असं त्यांनी म्हटलं.

Tags: ajay devgnakshay kumarbollywood actorsentertainmentshahrukh khan
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Sharmila Shinde Shares Experience
Entertainment

“सीनमध्ये बाळ गेलं पण…”, ‘नवरी मिळे…’मधल्या दुर्गाला खऱ्या आयुष्यात झाला शारिरीक त्रास, म्हणाली, “रडले, रागावले…”

मे 19, 2025 | 7:00 pm
achint kaur struggle for work
Entertainment

१८व्या वर्षातच लग्न, घटस्फोट, बॉयफ्रेंडचीही पाठ; आता कामासाठी वणवण फिरतेय सुप्रसिद्ध अभिनेत्री, ओळखणंही कठीण

मे 19, 2025 | 6:38 pm
worms and fungus in dairymilk Cadbury
Entertainment

कॅडबरीमध्ये अळ्या, बुरशी अन्…; साताऱ्याच्या डी-मार्टमधील धक्कादायक प्रकार, मराठी अभिनेत्रींनी शूट केला व्हिडीओ

मे 19, 2025 | 5:45 pm
Shilpa shirodkar corona positive
Entertainment

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला करोना, मुंबईत पुन्हा वाढले रुग्ण, आता परिस्थिती अशी की…

मे 19, 2025 | 4:55 pm
Next Post
bigg boss 17 vicky jain neil bhatt abhishek kumar khanzaadi nominated contestants of this week see the details

Bigg Boss 17 : 'बिग बॉस'च्या घरातील चार सदस्य नॉमिनेट, विकी जैनच्या नावाचाही समावेश, नक्की कोण घराबाहेर पडणार?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.