झी मराठी वाहिनी वरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. अल्पावधीतच मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. मालिकेतील रहस्यमय कथानकामुळे ही मालिका दिवसेंदिवस रोमांचक व रहस्यमय होत आहे. मालिकेतील नवनवीन ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका झाली आहे. अशातच या मालिकेत आता आणखी एक ट्विस्ट येणार आहे. मालिकेत एका नवीन पात्राची एण्ट्री होणार असल्याचे म्हटले जात आहे. अभिनेते राजन ताम्हाने यांची या मालिकेत एण्ट्री होणार आहे. (
‘मराठी टेलिबझ’ या इन्स्टाग्राम पेजने याविषयीची एक पोस्ट शेअर केली असून मालिकेतील त्यांच्या एण्ट्रीविषयी सांगितले आहे. झी मराठी वाहिनीने अद्याप याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. पण त्यांच्या एण्ट्रीबाबतच्या अनेक चर्चा सोशल मीडियावर रंगत आहेत. या मालिकेतील त्यांची भूमिका किंवा पात्र याविषयी अद्याप काही माहिती समोर आलेली नाही. दरम्यान राजन यांनी याआधी ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेत अप्पूच्या वाडीलयांकि भूमिका साकारली होती. त्यांच्या भूमिकेला चाहत्यांनी लोकप्रियता मिळाली होती. त्याचबरोबर मालिकेत ही नवीन एण्ट्री कधी होणार? याविषयीही अद्याप काहीही माहिती समोर आलेली नाही. परंतू काही ‘मराठी टेलिबझ’ने पोस्ट शेअर करत राजन ताम्हाने यांच्या मालिकेतील एण्ट्रीबाबत खुलासा केला आहे.

मालिकेत आतापर्यंत दोन पेट्यांचा उलगडा झाल्यानंतर आता तिसरी पेटीचाही उलगडा झाला आहे. गेल्या काही भागांत अद्वैतला सर्पदंश झाल्याचे प्रेक्षकांनी पाहिले. मात्र नेत्राने त्या सापाला भिरकावत अद्वैतचा जीव वाचवला. पण त्यानंतर पुन्हा अद्वैतने नेत्रावर हल्ला केला होता. या पेटीतून उलगडणाऱ्या रहस्यामुळे नेत्रा व अद्वैतच्या नात्यामध्ये बदल होणार का?, तसेच पेटीमधल्या मजकुरावर लिहिलेली सर्पलिपी वाचायला त्यांची मदत कोण करणार? या प्रश्नांचीही उत्तरं प्रेक्षकांना मिळणार आहेत.
दरम्यान, मालिकेत राजन ताम्हाने यांच्या नवीन एण्ट्रीविषयी चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. तसेच या पोस्टखाली नेटकऱ्यांनी कमेंट्स करत राजन यांच्या एण्ट्रीविषयी आनंद व्यक्त केला आहे. या पोस्टखाली अनेकांनी कमेंट्स करत त्यांच्या भूमिकेविषयी तर्क वितर्क लावले आहेत. त्यामुळे मालिकेत या एण्ट्रीमुळे आता काही नवीन वळण येणार का? या नवीन एण्ट्रीचा अद्वैत-नेत्राच्या नात्यावर काही परिणाम होणार का? हे पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत.