‘बिग बॉस’च्या यंदाच्या १७ व्या पर्वात आलेल्या जोड्यांमध्ये प्रेमापेक्षा अधिक संघर्षच पहायला मिळाला आहे. या घरातील जोड्यांपैकी एक लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेत्री अंकिता लोखंडे व तिचा पती विकी जैन. हे दोघे नेहमीच काहीना काही कारणावरून चर्चेत राहतात. ‘बिग बॉस’च्या घरात या दोघांमध्ये अनेकदा खटके उडाले आहेत. अशातच या शोचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे, ज्यात दोघांमध्ये नॉमिनेशन टास्कवरुन भांडण होत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (Bigg Boss 17 New Promo)
या प्रोमोमध्ये ‘बिग बॉस’ घरातील सदस्यांसाठी तिन्ही घराचे दरवाजे पुन्हा उघडत आहेत. पण त्यात त्यांनी एक नवीन ट्विस्ट आणत प्रेक्षकांना आश्चर्यचकित केले आहे. या प्रोमोमध्ये असे दिसतं की, ‘बिग बॉस’ अंकिताला थेरपी रूममध्ये बोलावतात आणि “‘दिल की मकान’ कायमचे राहण्यासाठी तुला नीलऐवजी विकीला नॉमिनेट करावं लागेल” असं म्हणतात. मात्र अंकिता यासाठी स्पष्ट नकार देते. त्याचबरोबर ‘बिग बॉस’ अंकितानंतर विकीलादेखील थेरपी रूममध्ये बोलवतात आणि अंकिताला म्हटल्याप्रमाणे विकीलाही ते असं सांगतात की, “या दिल के मकानमध्ये कायमचे राहण्यासाठी तू मागच्या वेळेस जसं नीलला नॉमिनेट केलं होतं, तसं तुला आता अंकिताला नॉमिनेट करावं लागणार आहे.”
Promo #BiggBoss17 #AnkitaLokhande aur #VickyJain ki theraphy, Yeh choice badal degi unka rishta? pic.twitter.com/l7Sl84HnaU
— The Khabri (@TheKhabriTweets) December 6, 2023
पुढे प्रोमोमध्ये असे दिसते की, ‘बिग बॉस’ घरातील इतर सदस्यांना अंकिता व विकी यांना थेरपी रूममध्ये विचारलेल्या प्रश्नांविषयी आणि अंकिताच्या निर्णयाविषयी सांगतात. यानंतर ते “विकीने काय निर्णय घेतला यांची तुम्हाला कल्पना आहे का?” असं विचारतात. तेव्हा घरातील सर्व सदस्य “विकीने अंकिताला गेमसाठी नक्की नॉमिनेट केले असणार” असं एकत्र म्हणतात. दरम्यान, या प्रोमोमध्ये ‘बिग बॉस’ने विकीचा निर्णय जाहीर केलेला नाही. मात्र या निर्णयावरून दोघांमध्ये वादाची ठिणगी पडल्याचे दिसत आहे.
पुढे या प्रोमोमध्ये अंकिता विकीला असे म्हणते की, “मी तुझी भावना समजू शकते.” यावर विकी तिला म्हणतो, “मग हे सजल्यानंतर तुझ्या तोंडून सारखं अरे अरे का येत आहे?” पुढे अंकिता पुन्हा त्याला असं म्हणते की, “तू मला पण एखाद्या खेळासारखे वापरत आहेस.” दरम्यान, त्यांच्यात याच्यावरून जोरदार भांडण होत असल्याचे दिसत आहे. आणि या भांडणांमुळे विकीने अंकिताला संपूर्ण पर्वासाठी नॉमिनेट केले असल्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यामुळे आगामी भागांत अंकिता-विकी यांच्या नात्यात काय समस्या येणार?, विकी अंकिताला घरात राहण्यासाठी नॉमिनेट करणार का? त्याचबरोबर या निर्णयाचा त्यांच्या नात्यावर काय परिणाम होणार? ही पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.