अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांनी २०२२ मध्ये मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न केलं. आता लग्नाच्या तीन वर्षांनंतर हे दोघं आई-बाबा बनणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशातच नुकताच त्याने ०९ जानेवारी २०२५ रोजी फरहानने त्याचा ५१ वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्त त्याला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मराठी मनोरंजन विश्वातूनही त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. अभिनेता पुष्कर जोगने फरहानबरोबरचा फोटो शेअर केला आहे आणि त्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. (Pushkar Jog on trollers)
या पोस्टमध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा फरहान अख्तर, हे तुझ्यासाठी… नक्की वाच… जेव्हा १०-१२ वर्षांपूर्वी मी करिअरच्या उतरत्या टप्प्यात होतो. तेव्हा माझ्या बाबांचं निधन झालं आणि चित्रपटाची निर्मिती करताना मला फसवलं गेलं. यामुळे मी खूप खचलो होतो. मी आर्थिक संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना इंडस्ट्रीने माझ्याबद्दल लिहिणं बंद केलं. त्यानंतर मी ‘भाग मिल्खा भाग’ चित्रपट पाहिला. या चित्रपटातील तुझ्या अभिनयाने मी भारावून गेलो. हा चित्रपट अजूनही सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. मी हा चित्रपट कुठेही पाहू शकतो”.

यापुढे त्याने असं म्हटलं की, “एका सीनमध्ये तू जखमी झालेल्या पायाने धावतोस ते माझ्यासाठी प्रेरणा देणारं होतं. तू माझ्यासह अनेकांना खरोखरच प्रेरणा दिली. मी काही वर्षांनी पुनरागमन केलं आणि तेव्हापासून कधी मागे वळून पाहिलं नाही. मला प्रेरणा दिल्याबद्दल तुझा ऋणी आहे. तुझ्यावर ईश्वराचे नेहमी आशीर्वाद राहो. लवकरच भेटू”. या पोस्टला अनेकांनी लाईक्स व कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे. मात्र या पोस्टखालील एका कमेंटने सर्वांचे लक्ष वेधलं आहे. या पोस्टखाली एका नेटकरी महिलेने असं म्हटलं आहे की, “या फालतू लोकांना काय भाव देत आहेस. तुला असं वाटत आहे का यांचं कौतुक केल्यावर तुला बॉलीवूडमध्ये काम मिळेल?”.
आणखी वाचा – बायकोच्या डोहाळ जेवणालाही जाऊ शकला नाही संग्राम साळवी, म्हणाला, “वाईट वाटलं पण…”
त्यावर पुष्कर म्हणाला की, “मी जर चाटू असतो ना आज खूप मोठा झालो असतो. मला जे वाटलं ते मी व्यक्त झालो. जे माझ्या मनात आहे, तेच माझ्या तोंडावर आहे”. त्यानंतर ती नेटकरी महिला म्हणाली की, “हाच नाही. तर तू अनेक बॉलीवूड कलाकारांबरोबर फोटो पोस्ट करत असतोस आणि असं दाखवतोस की, बॉलीवूडवाल्यांबरोबर माझी किती ओळख आहे”. त्यानंतर पुन्हा अभिनेत्याने असं म्हटलं आहे की, “प्रिय दीपिका जी.. हो आहे ओळख. मग पुढे काय? तुम्हाला समस्या आहे का? तुला अटेन्शन हवं आहे का?” यानंतर पुन्हा त्या नेटकरी महिलेने असं म्हटलं आहे की, “तुम्ही काय मला अटेंशन देणार… हे असे उद्योग करून अटेंशन तर आपल्याला पाहिजे”.

पुढे पुष्कर म्हणाला, “तुझा आत्मा नाराज झाला आहे. ईश्वराचे तुझ्यावर आशीर्वाद राहो” त्यावर त्या युजरने प्रतिक्रिया दिली की, “तुलाही”. मग पुष्कर म्हणाला, “धन्यवाद, तू मला आशीर्वाद देणार हे मला माहीत होतं.” तेव्हा ती महिला पुन्हा म्हणाली की, “नाराज झालेल्या आत्म्यासाठी नाही म्हणाले” यावर पुष्कर म्हणाला, “ताई, आता १२.५७ वाजलेत. आता झोप. डाटा संपेल नाहीतर”. यावर नेटकरी महिला म्हणते की, “डाटा अनलिमिटेड आहे…व्हायफाय आहे” नंतर पुष्कर म्हणाला की, “तुझ्या डोक्यातला डाटा मला म्हणायचं होतं…चल आता झोप”. मग ती नेटकरी त्याला “ओके शुभ रात्री” असं म्हणाली.