अभिनेत्री खुशबू तावडेच्या घरी काही दिवसांपूर्वी तिच्या दुसऱ्या गारोदरपणाबद्दलची खुशखबर दिली. एका लहान मुलीला जन्म देत खुशबू दुसऱ्यांदा आई झाली. काही दिवसांपूर्वी खुशबूने ही आनंदाची बातमी जाहीर केली. याआधी २ नोव्हेंबर २०२१मध्ये खुशबूला मुलगा झाला होता. ज्याचं नाव राघव असून तो आता तीन वर्षांचा आहे. त्यानंतर खुशबू व संग्राम साळवीच्या घरी दुसऱ्या पाहुण्याचं आगमन झालं. जुलै महिन्यात खुशबूचं डोहाळे जेवण पार पडलं. याची खास झलकही सोशल मीडियावर पाहायला मिळाली होती. घरीच साध्या पद्धतीने आणि मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत खुशबूचं हे दुसरं डोहाळे जेवण पार पडलं. मात्र या खास कार्यक्रमासाठी खुशबूचा नवरा गैरहजर होता. (sangram salvi on khushboo tawde baby shower)
खुशबूच्या या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला संग्राम साळवी दिसला नव्हता. कारण ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेतील चित्रीकरणाचा संग्रामचा पहिला दिवस होता. त्यामुळे त्याने व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून खुशबूच्या दुसऱ्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. या अनुपस्थितीबद्दल आता संग्रामने त्याची प्रतिक्रिया दिली आहे. थोडंसं वाईट वाटतं. पण जे काम करत आहे, ते माझ्या कुटुंबासाठीच आहे हाच त्यामागचा विचार असतो असं त्याने सांगितलं.
इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत संग्रामने असं म्हटलं की, “थोडंसं वाईट वाटतं. घरी एखादा कार्यक्रम असेल आणि सगळे तिथे असतील तर मीही असलो पाहिजे असं वाटतं. पण कुठे तरी मनात हा दूसरा विचारही येतो की, मी आता जे काम करत आहे, ते माझ्या कुटुंबासाठीच आहे. माझ्या चांगल्या भविष्यासाठीच आहे. त्यामुळे घरचेही समजून घेतात. पण घरी गेल्यावर मी राघव आणि राधीशी बोलल्यावर सगळा थकवा आणि जे काय आपण कार्यक्रमाला उपस्थित नव्हतो हे निघून जातं. मग पुन्हा नव्याने सुरुवात होते”.
आणखी वाचा – अंकिता वालावलकरची लगीनघाई! कपडे खरेदीला सुरुवात, बहिणींबरोबर करत आहे जय्यत तयारी
दरम्यान, अभिनेत्री खुशबू तावडे आणि अभिनेता संग्राम साळवी हे मराठी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय जोडपे आहे. त्यांनी २०१८ साली लग्न केले. नोव्हेंबर २०२१ मध्ये त्यांना पहिला मुलगा झाला. त्याचे नाव राघव असून नुकतंच खुशबूच्या घरी एका चिमुकलीचेदेखील आगमन झाले आहे, जिचे नाव राधी असं ठेवण्यात आलं आहे