मराठी मनोरंजन विश्वातील अभिनेता प्रसाद ओक व अभिनेत्री मंजिरी ओक ही लोकप्रिय जोडी आहे. सोशल मीडियावर ही जोडी बर्यापैकी सक्रिय असलेली पाहायला मिळते. प्रसाद हा मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीचा अभिनेता व दिग्दर्शक आहे. तर मंजिरीनेदेखील काही वर्षांपूर्वीच निर्मितीक्षेत्रात पदार्पण केलं आहे. दोघांनीही शून्यातून आपल्या संसाराची सुरुवात केली आहे. तसेच ते दोघे एकमेकांबरोबर इन्स्टाग्रामवर धम्माल व्हिडीओ देखील बनवताना दिसतात. बरेचदा त्यांचे गमतीशीर व्हिडीओ पाहणं रंजक ठरतं. त्यामुळे प्रसाद व मंजिरीचे मजेशीर व्हिडीओ तुफान व्हायरल होतात. (Prasad Oak and Manjiri Oak Video)
अशातच पुन्हा एकदा प्रसाद व मंजिरीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. प्रसाद व मंजिरीने एक गमतीशीर व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ त्यांनी रिक्रिएट केला आहे. “कुणीतरी म्हणून ठेवलंय हेच जीवन आहे”, असं कॅप्शन देत मंजिरीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रसाद ( Prasad Oak ) मंजिरीला बोलताना दिसत आहे की, “खुद को कभी बेकार मत समझो, माना तुम हो…मत समजो”. हे ऐकून मंजिरी नाराज होते.
दोघांच्या या मजेशीर व्हिडीओवर इतर कलाकार मंडळींसह नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “ताईंचा घोर अपमान आहे हा”, “सर भीती नाही का वाटत हो”, “एवढ्या रिस्क नंतर केव्हढा प्रसाद”, “प्रसाद सर ( Prasad Oak ), जेवून झोपलात का उपाशी पोटी झोपलात?”, “बापरे काय डेंजर आहात सर तुम्ही”, “बापरे अवघड आहे”, “महाराष्ट्रातल्या सगळ्या पुरुषांच्या वतीने मनातले बोललात. आज काही खर नाही आहे प्रसाद सरांचे”, “प्रसाद दादा एवढी रिस्क चांगली नाही बरं. पटकन कधीतरी गेम पलटेल”, अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी मंजिरीची बाजू घेत प्रसादला टोकलं आहे.
प्रसाद ओकच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, प्रसाद ‘धर्मवीर २’, ‘वडापाव’, ‘जिलबी’, ‘पठ्ठे बापूराव’, ‘महापरिनिर्वाण’ , ‘रीलस्टार’ या आगामी चित्रपटांमध्ये पाहायला मिळणार आहे.