कोणत्या बापासाठी आपल्या मुलाने केलेली कोणतीही कामगिरी ही कौतुकास्पदच असते. मग ते शाळेत जास्तीचे मार्क मिळवणे असो वा एखाद्या मोठ्या हुद्द्याची नोकरी मिळवणे असो. बापाला लेकाबद्दल कायमच कौतुक असतं आणि आपल्या वडिलांना आपला अभिमान किंवा कौतुक वाटावं यासाठी प्रत्येक मुलगाही मेहनत घेत असतो. अशीच मेहनत घेत एका मुलाने आपल्या वडिलांसाठी एक अलिशान कार खरेदी केली आहे आणि हा मुलगा म्हणजे अभिनेता व दिग्दर्शक प्रसाद ओकचा मुलगा. अभिनेता प्रसाद ओकचा मुलगा सार्थक याने स्वत:च्या वाढदिवशी त्याच्या बाबांना अत्यंत खास भेटवस्तू दिली. ही भेट पाहून प्रसाद व त्याची पत्नी मंजिरी दोघंही गहिवरले. (Prasad Oak Son New Car)
प्रसादला मयंक व सार्थक अशी दोन मुलं आहेत. यापैकी सार्थक या मोठ्या मुलाने प्रसादला गिफ्ट म्हणून खास लक्झरी गाडी दिली. नवीन गाडी घरात आल्यावर प्रसादची पत्नी मंजिरी ओकने मंगळवारी खास पोस्ट शेअर करत आपल्या दोन्ही मुलांचं कौतुक केलं आहे. या पोस्टबरोबर २२ वर्षांआधीचा फोटो शेअर करत तिने एका जुन्या आठवणीला उजाळा दिला. अशातच आता प्रसादनेदेखील मुलाबद्दलच्या भावना व्यक्त करत पोस्ट शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये प्रसाद व मंजिरी यांच्या चेहऱ्यावरील आई-बाबा महणून आनंद व अभिमान अगदी स्पष्टपणे दिसून येत आहे.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : निक्कीने अरबाजला वैभव विरोधात भडकवलं, मित्रांमध्ये फूट, म्हणाली, “तुझ्यावर तो जळतो आणि…”
प्रसादने सोशल मीडियावर खास व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओखाली त्याने लेकाबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. यांमध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “सार्थक… मुलगा असूनही “बाप” झालास. अत्यंत अभिमान वाटतो तुझा. देव कायम तुझ्या पाठीशी राहो आणि तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच प्रार्थना. वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा आणि खूप खूप प्रेम”. तसंच या पोस्टसह प्रसादने लेकाचे आभार मानत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. या पोस्टवर मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी कमेंट्स करत शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रसादने शेअर केलेल्या या व्हिडीओनध्ये ते गाडी खरेदी करायला गेल्यानंतरचे काही खास व भावनिक क्षण पाहायला मिळत आहेत. यावेळी प्रसाद व मंजिरीच्या डोळ्यांमध्ये लेकाबद्दलचा अभिमानही पाहायला मिळत आहे. दरम्यान, प्रसादच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर आता लवकरच तो ‘धर्मवीर-२’ या चित्रपटात झळकणार आहे. येत्या २७ सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘धर्मवीर’च्या प्रचंड यशानंतर सर्वांना या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे.