कलाक्षेत्रातील अशी अनेक कलाकार मंडळी आहेत जी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे शिल्पा शिंदे. शिल्पा शिंदे हिने आजवर अनेक मालिकांमध्ये महत्तपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. मात्र अभिनेत्रीच्या अंगुरी भाभी या पात्राला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. अंगूरी भाभी म्हणजेच शिल्पा शिंदे सध्या स्टंट रिॲलिटी शो ‘खतरों के खिलाडी १४’मध्ये दिसत आहे. या शोमध्ये स्टंट करण्याबरोबरच शिल्पा खूप मस्ती करतानाही दिसत आहे. तिची बबली स्टाइलही चाहत्यांना खूप आवडते. (Shilpa Shinde On Wedding)
शिल्पा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. चाहते त्यांच्या लग्नाची वाट पाहत आहेत. शिल्पा ४९ वर्षांची आहे. वयाच्या ४९ व्या वर्षी शिल्पाने आता लग्न करण्याचे ठरवले आहे. शिल्पा आधी रोमित राजसह लग्न करणार होती. रोमित व शिल्पा यांचा साखरपुडा झाला. त्यानंतर लग्नपत्रिकाही छापल्या गेल्या पण शेवटच्या क्षणी हे नाते तुटले. त्यानंतर शिल्पाने लग्नाचा विचार केला नाही. पण आता ती लग्नाचा विचार करत असल्याचं दिसत आहे. ज्या अभिनेत्याबरोबर तिचे नाव जोडले जात आहे त्याचे नाव करणवीर मेहरा असे आहे.
करणवीरचे याआधी दोनदा लग्न झाले आहे पण त्याची दोन्ही लग्ने अयशस्वी नाहीत. काही वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला. ‘खतरों के खिलाडी’मध्ये शिल्पा आणि करणवीर एकत्र दिसत आहेत. एका स्टंटदरम्यान करणवीर असं म्हणताना दिसत आहे की, “जर आपण हा स्टंट जिंकला तर आपण लग्न करु”. या शोमध्ये जेव्हा करणने शिल्पाला आय लव्ह यू असे म्हटले तेव्हा अभिनेत्रीने लाजत उत्तर दिले. मात्र, लग्नाच्या मुद्द्यावर शिल्पा म्हणाली, “नाही, गडबड होईल”. तर करण म्हणाला, “काही अडचण येणार नाही, आम्ही करु”.
करण व शिल्पा आधीपासूनच मित्र आहेत आणि एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखतात. ‘भाभीजी घर पर हैं’ या चित्रपटात अंगूरी भाभीची भूमिका साकारुन शिल्पा शिंदेला लोकप्रियता मिळाली. शोमध्ये त्यांची बोलण्याची शैली खूप आवडली होती. आजही अनेक लोक तिला अंगूरी भाभी याच नावाने ओळखतात.