मराठी मनोरंजनसृष्टीतील लाडक्या कपलच्या घरात सध्या लगीनघाई सुरु झाली आहे. आपल्या अभिनयातून प्रेक्षकांचं मनं जिंकणारं जोडपं लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. ते जोडपं म्हणजे अभिनेता प्रसाद जवादे व अभिनेत्री अमृता देशमुख. ‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रमामुळे या दोघांचे बंध जुळून आले. या दोघांमध्ये मैत्री वाढली आणि पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यानंतर या दोघांनी आपल्या प्रेमाची कबूली दिली. त्यानंतर काही काळातच या जोडप्यानं साखरपुडा उरकून घेतला. (prasad amruta pre marriage rituals attractive look)
आता लवकरच ते एकमेकांचे आयुष्यभराचे सोबती बनणार आहेत. त्यांच्या लग्नाची तारीख आता जवळ येत आहे. त्यांच्या लग्नापूर्वीच्या विधींनाही सुरुवात झाली आहे. नुकताच त्यांचा ‘ग्रहमख’ या लग्नापूर्वीच्या पहिल्या विधी पार पडला. त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.‘ग्रहमख’ ही विधी सर्वसाधारणपणे मुंज, विवाह यासारख्या मंगलकार्यांच्या आधी करण्याची पद्धत आहे. जी विधी लग्नाच्या एक दोन दिवस आधी केली जाते.
नुकतीच प्रसाद-अमृताची लग्नापूर्वीची ही विधी पार पडली. याचे फोट सध्या सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहेत. या फोटोत वर-वधू यांचा पारंपारीक थाट पाहायला मिळाला. यावेळी अमृताने हिरव्या रंगाची नव्वारी साडी नेसली होती. त्यावर तिने साजेसे पारंपरीक सोन्याचे दागिने परिधान केले होते. कपाळाला तिने लावलेली चंद्रकोर, नाकातील नक्षीदार नथ अमृताचा लूक आणखीनच खुलवत होती. तर या विधीसाठी प्रसादही खूप छान तयार झाला होता. त्याने यावेळी निळ्या रंगाचा सिंपल पण डिझायनर पारंपरीक कुर्ता घातला होता. या लूकमध्ये या गोड कपलने रोमाँटिक फोटोशूटही केलं.
सध्या हे फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहेत. नेटकऱ्यांसह कलाकारांनीही या फोटोवर लाईक, कमेंटचा वर्षाव केला आहे. अभिनेत्री मुग्धा रानडे हिने कमेंट केली ‘परीकथा’ असं लिहीत हार्टचे इमोजी शेअर केलं आहे. त्याचबरोबर एका नेटकऱ्याने कमेंट केली की, ‘अरे वा क्या बात है! दोघं फार गोड दिसत आहात’, असं लिहिल आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्याने, ‘तुम्ही दोघं सोबत खूप छान दिसत आहात देवाची कृपा तुमच्यावर सदैव राहो’, असं लिहीत या जोडप्याचं कौतुक केलं आहे.