रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पुण्यातील तरुणाई नशेच्या आहारी, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा संताप, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “पुणेकर म्हणून…”

Saurabh Moreby Saurabh More
जून 25, 2024 | 12:25 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Marathi actor Pitya Bhai aka Ramesh Pardeshi shared an angry post on the pune drugs viral video

पुण्यातील तरुणाई नशेच्या आहारी, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा संताप, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “पुणेकर म्हणून...”

पुण्यातील एफसी रोडवरील नामांकीत हॉटेलमध्ये तरुणांचा ड्रग्जची नशा करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला अन् एकच खळबळ माजली. यामुळे पुन्हा एकदा पुण्यातील मध्यरात्री सुरू असलेल्या पब्ज आणि बारचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये, हॉटेलमधील वॉशरुमममध्ये टॉयलेटजवळ बसून काही तरुणी ड्रग्ज घेत असल्याचे दिसून येत आहे. यावर आता सर्व स्तरांतून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अशातच ‘मुळशी पॅटर्न’ फेम अभिनेते, दिग्दर्शक पिट्या भाई म्हणजे रमेश परदेशी यांनीही यासंदर्भात पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे.

रमेश परदेशी यांनी काही महिन्यांपूर्वी पुण्यातील वेताळ टेकडीवरील नशेच्या आहारी गेलेल्या तरुणींचा एक व्हिडीओ शेअर केला होता. यावेळी त्यांनी आजची तरुणाई कशाप्रकारे नशेच्या आहारी जाऊन चुकीच्या मार्गाला जात आहे. यावर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. अशातच त्यांनी या व्हायरल व्हिडीओनंतर एकदा आपली संतप्त भूमिका व्यक्त केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Ramessh P Pardeshi (@_pitya_bhai)

आणखी वाचा – आता युद्ध पेटणार! राजाध्यक्ष कुटुंबाला नष्ट करण्यासाठी विरोचक तयार, देवी आईच्या लेकी वाचवणार का?

रमेश परदेशी हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असतात. सोशल मीडियावर ते अनेकदा राजकीय व समाजिक मतं व्यक्त करत असतात. अशातच त्यांनी या व्हायरल व्हिडीओवर त्यांची संतप्त भूमिका व्यक्त करताना असं म्हटलं आहे की, “व्यसन, ड्रग्ज या गोष्टी आधी शहराच्या वेशीवर होत्या, मग टेकड्या आणि आता मध्यवस्तीत आल्या आहेत. घरापर्यंत किंवा घरात यायची वाट पाहणार का?” तसेच यापुढे त्यांनी या पोस्टद्वारे पुणेकरांना “आपण पुणेकर म्हणून काही करणार की नाही मी तर करणार तुम्ही?” असा प्रश्नही विचारला आहे.

आणखी वाचा – सोनाक्षी सिन्हाच्या लग्नात दोन्ही सख्ख्या भावांची गैरहजेरी, भावांनीच दिलं स्पष्टीकरण , म्हणाला, “मला एक-दोन दिवस…”

त्यांच्या या पोस्टखाली अनेकांनी त्यांना या संदर्भात काहीही मदत लागली तर करण्याचे आवाहन दिले आहे. परप्रांतीय विद्यार्थी यांच्यामुळ हे सगळं पसरलं आहे, विकणारे पाहिले शोधा बाकी सगळे मिळून जातील, जो पर्यंत कुणी पुढे येत नाही तो पर्यंत हे असच चालायचं” अशा अनेक कमेंट्स करत अनेक चाहत्यांनी त्यांना या प्रकरणी शोध घेण्याचे व मदत करण्याचे सांगितले आहे.  त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणी पोलिस प्रशासन, स्थानिक व्यवस्था काय निर्णय घेणार?, या प्रकरणात गुंतलेल्या मुलांची चौकशी केली जाणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.  

Tags: entertainment newsmarathi actorramesh pardeshi
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Nagarjuna Akkineni apologised

दिव्यांग चाहत्याला बॉडीगार्डने ढकललं, नेटकऱ्यांनी नको नको ते सुनावल्यानंतर नागार्जुनने मागितली जाहीर माफी, नेमकं काय घडलं?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.