बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिच्या लग्नामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. अखेर सात वर्षे डेटिंग केल्यानंतर 23 जून रोजी दोघांनी लग्न केले. मुंबईत अगदी थाटामाटात या जोडप्याचा विवाहसोहळा संपन्न झाला आहे. मुंबईत सोनाक्षीच्या घरी स्पेशल मॅरेज ॲक्टनुसार दोघांनी एकमेकांबरोबर विवाहगाठ बांधली. लग्नाची नोंदणी करताना सोनाक्षी व झहीरचे कुटुंबीय उपस्थित होते.
सोनाक्षीकया लग्नाला तिचे सर्व कुटुंबीय उपस्थित असले तरी तिचे दोन भाऊ बहिणीच्या लग्नात अनुपस्थित होते. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाबाबत भाऊ आणि बहिणीमधील मतभेदाच्या अफवेला आणखी चालना मिळाली. पण आता अखेर लव सिन्हा यांनी मौन तोडत यावर प्रतिक्रिया दिली आहे. सोनाक्षीच्या लग्नात लव्ह-कुश हे तिचे भाऊ कुठेच दिसले नाहीत. सूत्रांनुसार, सोनाक्षीचे पालक लग्नाला उपस्थित होते आणि त्या दिवसासाठी स्वाभाविकपणे ते उत्सुकही होते. मात्र, तिचे भाऊ लग्न आणि रिसेप्शनला उपस्थित नव्हते. फोटोग्राफर्सना हे दोघे शेवटपर्यंत कुठेही येताना दिसले नाहीत.
बहिणीच्या लग्नातील अनुपस्थितीबाबत लव सिन्हाने ‘हिंदुस्तान टाइम्स’शी बोलताना त्याची प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी तो असं म्हणाला की, “मला एक-दोन दिवस द्या. मला वाटल्यास मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईन. विचारल्याबद्दल धन्यवाद”.
आणखी वाचा – वृषभ, सिंह व तूळ राशीच्या लोकांसाठी मंगळवारचा दिवस लाभदायी, सर्व मनोकामना होतील पूर्ण, जाणून घ्या…
यापूर्वी, लव सिन्हा यांनी ETimes शी बोलताना झहीर इक्बालबरोबर त्याच्या बहिणीच्या लग्नाच्या बातमीवर प्रतिक्रिया दिली होती. त्यावेळीही त्यांनी या प्रकरणी मौन बाळगले होते. त्यांनी ETimes ला “मी सध्या मुंबईबाहेर आहे आणि मला याबद्दल बोलायचे नाही” अशी प्रतिक्रिया दिली होती.
आणखी वाचा – आता युद्ध पेटणार! राजाध्यक्ष कुटुंबाला नष्ट करण्यासाठी विरोचक तयार, देवी आईच्या लेकी वाचवणार का?
दरम्यान, सोनाक्षीचा जवळचा मित्र अभिनेता साकिब सलीमने तिच्या लग्नात भावाची भूमिका पार पाडली होती. सोनाक्षीच्या लग्नात तिच्या मित्रांनी आणि साकिबने छत्रीचे एक टोक धरलेले पाहायला मिळाले. त्यामुळे आता बहिणीच्या लग्नात भावांच्या अनुपस्थितीमुळे सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आले आहे.