रविवार, सप्टेंबर 6, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“एक इमेज डागाळली आणि…”, शरद उपाध्ये प्रकरणावर निलेश साबळे पुन्हा बोलले, म्हणाले, “आता माझेच लोक…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 17, 2025 | 11:23 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
nilesh sable reaction on sharad upadhye

"एक इमेज डागाळली आणि…", शरद उपाध्ये प्रकरणावर निलेश साबळे पुन्हा बोलले, म्हणाले, "आता माझेच लोक…"

nilesh sable reaction on sharad upadhye : प्रसिद्ध राशिचक्रकार शरद उपाध्ये आणि अभिनेते, दिग्दर्शक निलेश साबळे यांच्यातील वाद कानावर आला. शरद यांनी निलेश विरोधात फेसबुक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी निलेशवर टीकेची झोड उठवली. त्यानंतर निलेश यांनी शांत न राहता थेट व्हिडीओद्वारे आपली बाजू मांडत मुद्दा स्पष्ट केला. निलेश व शरद यांच्यातील या वादावर अनेकांनी प्रतिक्रिया दिलेल्या पाहायला मिळाल्या. हे प्रकरण काही दिवसांपासून शांत झाल्याचं पाहायला मिळत असतानाच आता निलेशने एका मुलाखतीत पुन्हा एकदा या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

निलेश साबळे यांनी नुकतीच ‘लोकशाही मराठी’ या चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी शरद उपाध्ये प्रकरणाविषयी भाष्य करताना ते म्हणाले की, “मी तो विषय आता विसरुन गेलो आहे, तुम्ही विचारलात म्हणून… कारण, एखादी गोष्ट तेव्हाच थांबते जेव्हा आपण त्याविषयीचं बोलणं थांबवतो. मी त्या व्हिडीओमध्ये नमूद केल्याप्रमाणे सन्माननीय शरद उपाध्ये सरांनी यापूर्वी सुद्धा दोन-तीनवेळा अशा पोस्ट केल्या होत्या. तेव्हा मी गोष्टी सोडून दिल्या होत्या. सहा वर्षांपूर्वी सुद्धा त्यांनी अशीच एक पोस्ट लिहिली होती. त्यातही त्यांनी बरंच काही म्हटलं होतं. शेवटी सांगायचं काय तर कलाकारांना फक्त ऐकूनच घ्यावं लागतं. कलाकार व्यक्त झाले तरी समस्या निर्माण होते आणि एखादा कलाकार व्यक्त झाला नाही तरी समस्या निर्माण होतात”.

आणखी वाचा – Video : मुळशीमधील गावात शेतीत रमले प्रवीण तरडे, शेत बांधावर लावलं सफरचंदाचं झाड, व्हिडीओ व्हायरल

पुढे निलेश साबळे म्हणाले, “पूर्वी या गोष्टी व्हायच्या नाहीत. पण, आता काय झालंय. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. त्यामुळे मला अमिताभ बच्चन यांच्याबद्दल जरी लिहायचं असेल तरी मी पटकन लिहू शकतो. माझी पोस्ट जर त्यांच्यापर्यंत पोहोचली तर, दुसऱ्या मिनिटाला ते सुद्धा ती पोस्ट वाचू शकतात. आता सोशल मीडिया संवाद साधण्याचं नवीन माध्यम झालंय पण, त्यावर काहीही लिहिणं हे योग्य नाही. मला असं वाटतं की अलीकडच्या काळात हे फार सुरु झालं आहे. आपण एखाद्या गोष्टीवर काहीही बोलायच्या आधी प्रतिक्रिया यायला सुरु होतात”.

“त्या घटनेनंतर अनेकांना असं वाटलं, ‘अरे निलेश साबळेचा हा चेहरा आम्हाला माहितीच नव्हता’, ‘अरे बरं झालं तुम्ही निलेशचा खरा चेहरा आमच्यासमोर आणला, ‘निलेश साबळे असा असेल असं आम्हाला वाटलंच नव्हतं’, असा विचार अनेकांनी केला. कलाक्षेत्रात तुमची एक इमेज असते आणि ती जर अशा प्रसंगांमुळे डागाळली गेली तर, पुढच्या कामांवर त्याचा निश्चित परिणाम होतो. मला माझेच लोक विचारु लागले. तू असा वागला होतास का? मग मी ठरवले की, नाण्याची एक बाजू लोकांना समजली आता दुसरी बाजू कळणं फार गरजेचं आहे. एखादी मोठी व्यक्ती जेव्हा हे सगळं सांगते. तेव्हा लोकांना वाटतं अरे हेच बरोबर आहे. त्यामुळे यावेळी सविस्तर बाजू मांडणं मला महत्त्वाचं वाटलं”.

आणखी वाचा – मराठी भाषेवरुन रितेश देशमुखला सुनावणाऱ्या इन्फ्लुएन्सरवर डीपी भडकला, थेट व्हिडीओ केला शेअर, म्हणाला, “तुझे विचार…”

“सगळ्या गोष्टींचा विचार करुन आपण आपला मुद्दा प्रामाणिकपणे मांडला पाहिजे असा विचार मी केला. त्यांना त्यांचं मत मांडण्याचा निश्चित अधिकार आहे पण, त्यांनी नीट माहिती घ्यायला हवी होती. गैरसमजातून झालेला तो सगळा प्रकार होता. मी सगळ्यांना एकच सांगेन आता तो विषय माझ्या बाजूने पूर्णपणे संपला आहे. शरद उपाध्ये सर आपल्यापेक्षा खूप मोठे आहेत आणि मी त्यांचा आयुष्यभर आदरच करेन”, असं अखेरी निलेश म्हणाले.

Tags: marathi actornilesh sableSharad Upadhye
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Next Post
Dipika Kakar Father Met Her

कॅन्सरच्या शस्त्रक्रियेनंतर दीपिका कक्करला भेटायला आले वडील, लेकीला पाहताच झाले भावुक, अभिनेत्रीलाही अश्रू अनावर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.