मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : मुळशीमधील गावात शेतीत रमले प्रवीण तरडे, शेत बांधावर लावलं सफरचंदाचं झाड, व्हिडीओ व्हायरल  

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 16, 2025 | 6:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Pravin Tarde village video

Video : मुळशीमधील गावात शेतीत रमले प्रवीण तरडे, शेत बांधावर लावलं सफरचंदाचं झाड, व्हिडीओ व्हायरल

शहरात कामासाठी कितीही रमलो तरी प्रत्येक व्यक्तीची नाळ ही त्याच्या गावच्या मातीशी जोडलेली असतेच. कलाकार मंडळींचंही असंच काहीसं आहे. सुप्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनाही गावच्या मातीची अधिक ओढ आहे. कामामधून अधिक वेळ मिळाला की, ते मुळशी तालुक्यातील त्यांच्या गावी जातात. तिथल्याच मातीत रमतात. दरम्यान त्यांनी गावचे बरेच व्हिडीओ सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत. आताही प्रवीण यांनी गावच्या शेतातील व्हिडीओ शेअर केला आहे. त्याचीच सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. प्रवीण शेत कामात मदत करत आहेत. त्यातच त्यांनी एक नवा प्रयोग केला होता. त्यांनी त्यांच्या शेतातील विविध भागांमध्ये सफरचंदाची झाडं लावली होती. (Pravin Tarde village video)

प्रवीण यांनी त्यांच्या शेताच्या बांधावर, रानमळ्याच्या जागेत सफरचंदाची झाडं लावली. त्यातलं शेताच्या बांधावर लावलेलं झाड टिकलं. ते आता मोठंही झालं आहे. त्याचदरम्यानचा एक व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये लावणीसाठी ते वडिलांची मदत करत असावेत असं दिसत आहे. डोक्यावर प्लास्टिकचं इरलं घेऊन ते शेतीच्या कामात जुंपले. पावसाच्या सरी आणि शेतीची कामं करण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत आहे.

आणखी वाचा – रितेश देशमुखला मोठा धक्का, जवळच्या व्यक्तीचं निधन, म्हणाला, “माझा मोठा भाऊ, मार्गदर्शक…”

View this post on Instagram

A post shared by Pravin Vitthal Tarde (@pravinvitthaltarde)

सफरचंदाचं झाड प्रवीण यांनी दाखवलं. तसेच त्यांनी याबाबत सांगितलं. प्रवीण म्हणाले, “दोन ते तीन वर्षांपूर्वी आम्ही एक प्रयोग केला होता. हे सफरचंदाचं झाड आहे. मुळशी तालुक्यात आजपर्यंत सफरचंदाचं झाड लावण्याचा प्रयोग झालेला नाही. सफरचंदाची झाडं आणून आम्ही आमच्या वेगवेगळ्या शेतामध्ये लावली होती. आमच्या गावातील हा खालचा भाग आहे. जिथे आम्ही भातशेती करतो. भातशेतीच्या बांधावर आम्ही हे झाड लावलं होतं. आणि काही झाडं दऱ्यात लावली होती”.

आणखी वाचा – अंकिता लोखंडेच्या चमकदार त्वचेचं रहस्य आहे तरी काय?, चांदीचा ग्लास, मॅजिक वॉटर आणि…

“दऱ्यात म्हणजे रानात देवराई असते तिथे लावलं होतं. त्यातलं एक झाड हे व्यवस्थित जगलं. झाड टिकलं आणि मोठं झालं आहे. या झाडाला सफरचंद येतील नाही येतील हा नंतरचा भाग आहे. पण हे झाड बांधावरती जगलं. हा प्रयोग जर यशस्वी झाला तर काहीतरी इथे नवीन करण्याची आमची एक कल्पना आहे. उन्हाळ्यामध्ये झाड टिकवून ठेवणं खूप अवघड असतं. माझे वडिलच इकडे सगळं काम करतात”. प्रवीण यांचं सोशल मीडियाच्या माध्यमातून कौतुक होत आहे.

Tags: entertainment newsmarathi actorpravin tarde
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरजच्या बाळाला भेटायला गेली, हॉस्पिटलमध्ये मिठाई वाटली अन्…; जान्हवीच्या ‘त्या’ व्हिडीओचं होतंय कौतुक

सप्टेंबर 8, 2026 | 12:19 pm
Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Next Post
dhananjay powar video

मराठी भाषेवरुन रितेश देशमुखला सुनावणाऱ्या इन्फ्लुएन्सरवर डीपी भडकला, थेट व्हिडीओ केला शेअर, म्हणाला, "तुझे विचार…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.