शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

फुलांची नेमप्लेट, पारंपरिक अंदाज अन्…; मंगेश देसाईंनी घेतलं नवं घर, पत्नी, मुलासह केला नव्या घरात गृहप्रवेश

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 13, 2024 | 6:20 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Mangesh Desai New Home

फुलांची नेमप्लेट, पारंपरिक अंदाज अन्...; मंगेश देसाईंनी घेतलं नवं घर, पत्नी, मुलासह केला नव्या घरात गृहप्रवेश

मराठी सिनेसृष्टीत बऱ्याच कलाकारांनी चाहत्यांसह आनंदाची बातमी शेअर केली. एकामागोमाग एक कलाकार मंडळी त्यांच्या लग्नाच्या, घराबाबत गुडन्यूज देताना दिसत आहेत. मराठी कलाकारांपैकी बऱ्याच कलाकारांनी स्वतःच घर घेतलं असल्याची आनंदाची बातमी शेअर केली. काही दिवसांपूर्वीच ऋतुजा बागवे, प्रसाद ओक, गिरीजा प्रभू, ऋता दुर्गुळे, अक्षय केळकर या कलाकारांनी नवीन घर घेत त्यांच्या नव्या घराची झलक चाहत्यांसह शेअर केली. यापाठोपाठ आता आणखी एका मराठमोळ्या कलाकाराने नवं घर घेतलं असल्याचं समोर आलं आहे. (Mangesh Desai New Home)

अभिनेते, निर्माते मंगेश देसाई यांनी नवं घर घेतलं असल्याची खुशखबर त्यांनी चाहत्यांसह सोशल मीडियावरुन शेअर केली आहे. सध्या मंगेश देसाई आनंद दिघे यांच्या जीवनपटावर आधारित असलेल्या ‘धर्मवीर २’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात व्यस्त असल्याचे दिसत आहेत. लवकरचं हा भव्य चित्रपट मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घालण्यास सज्ज होणार आहे. चित्रपट प्रदर्शनाआधी मंगेश यांनी त्यांच्या चाहत्यांसह एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. मंगेश यांनी नवं घर घेतलं असल्याची पोस्ट त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केली आहे.

आणखी वाचा – पवित्रा पुनिया व एजाज खानच्या नात्यात दुरावा, २ वर्षांनी वेगळे झाल्याबाबत अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली, “५ महिन्यांपासून…”

View this post on Instagram

A post shared by Mangesh Desai (@mangeshdesaiofficial)

मंगेश देसाईने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन नव्या घरात गृहप्रवेश केल्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मंगेश यांनी त्यांच्या नव्या घराची नेमप्लेट दाखवली आहे. सुंदर अशा फुलांनी सजवलेल्या या नेमप्लेटने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या नेमप्लेटवर मंगेश शलाका साहिल देसाई हे नांव पाहायला मिळत आहे. यावेळी व्हिडीओमध्ये मंगेश देसाई त्यांच्या पत्नी व मुलासह पाहायला मिळत आहेत. नव्या घराच्या या नेमप्लेटने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ही पोस्ट शेअर करत त्यांनी कॅप्शन देत म्हटलं आहे की, “आज मी खूप खुश आहे, तुम्हीसुद्धा माझ्यासाठी खुश असाल ना”.

आणखी वाचा – रणवीर सिंग व जॉनी सीन्सची ‘ती’ जाहिरात पाहून रश्मी देसाई भडकली, पोस्ट शेअर करत फटकारलं अन्…; म्हणाली, “मालिकांचा अपमान…”

आज गणेशजयंतीचे औचित्य साधत मंगेश यांनी त्यांच्या नव्या घरात गृहप्रवेश केलेला पाहायला मिळत आहे. यावेळी देसाई कुटुंबीय पारंपरिक अंदाजात दिसले. त्यांच्या या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळत आहे. शिवाय कलाकार मंडळींसह चाहत्यांनाही त्यांच्या या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव केलेला पाहायला मिळत आहे.

Tags: entertainmentmangesh desaimangesh desai familymangesh desai new home
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Mahesh Manjrekar shared his experience of shooting for Bigg Boss even while undergoing treatment for cancer

कॅन्सरवर उपचार घेताना महेश मांजरेकरांनी केले होते 'बिग बॉस'चे चित्रीकरण, हृदयस्पर्शी प्रसंग शेअर करत म्हणाले, "पायाला व पोटाला..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.