बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग त्याच्या अभिनयाबरोबरचं त्याच्या अतरंगी फॅशनसाठी प्रसिद्ध आहे. अभिनेत्याचा दिलखुलास स्वभाव अनेकदा प्रेक्षकांच्या पसंतीस पडतो तर काही वेळेस त्याला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. पण सध्या तो प्रकाशझोतात येण्याचे कारण थोडे वेगळे आहे. सोशल मीडियावर रणवीर व जॉनी सीन्स यांची एक लैंगिक संबंधा (इरेक्टल डिसफंक्शन) संबंधित असलेली जाहिरात अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. या जाहिरातीला नेटकऱ्यांनी डोक्यावर घेतले असून अनेक सेलिब्रिटींनीदेखील प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. पण मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री रश्मी देसाईने सोशल मीडियावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. (rashami desai angry post)
प्रसारित झालेली जाहिरात हिंदी मालिकेप्रमाणे बनवण्यात आली आहे. जाहिरातीचा लहेजा पाहता टेलिव्हिजन मालिकांची मस्करी करण्यात आल्याचे रश्मीचे म्हणणे आहे. याबद्दल व्यक्त होताना तिने भलीमोठी पोस्टदेखील लिहिली आहे. या पोस्टमध्ये ती म्हणते की,”मी माझ्या करिअरची सुरवात प्रादेशिक चित्रपट व मालिकांमधून सुरु केली. इथे सामान्य माणसं मालिकांबरोबरच बातम्या, क्रिकेट व बॉलिवूड चित्रपट पाहतात. ही जाहिरात खूपच अनपेक्षित होती. जे लोक मालिका विश्वामध्ये काम करतात त्यांच्यासाठी हे खूपच अपमानास्पद आहे.”
तसेच पुढे ती म्हणाली की, “मालिकांमध्ये काम करणाऱ्यांना नेहमीच कमी लेखले जाते. येथील लोक खूप कष्ट करतात. मात्र अशा जाहिराती लहान पडद्यावर दाखवल्या जात नाहीत तर त्या मोठ्या पडद्यावर दाखवल्या जात्यात. अशा जाहिराती करुन मालिकांचा अपमान होत आहे त्यामुळे हा मालिका विश्वासाठी सुचकतेचा ईशारा आहे असे ती म्हणाली. मी स्वतः या जाहिरातीमुळे दुखावले आहे कारण मालिकाविश्वाने मला ओळख मिळवून दिली. आशा आहे की तुम्ही आमच्या भावनांचा आदर कराल”. रश्मी ही लहान पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. रश्मी ‘बिग बॉस’ हिंदीच्या १३व्या सीजनमध्ये दिसली होती. सोशल मीडियावर देखील ती नेहमी सक्रिय असून आपल्या डान्स व अभिनयाचे रील शेअर करत असते.
आणखी वाचा -अभिनेत्री मल्लिका राजपूतचे निधन, घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
रणवीर व जॉनी एकत्र काम करताना पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सर्वच सोशल मीडियावर ही जाहिरात प्रचंड व्हायरल झाली असून यावर मिम्सचा अक्षरशः पाऊस पडत आहे. रणवीरने ही जाहिरात आपल्या सोशल मीडिया हँडलवरुन शेअर केली होती. या व्हिडीओला २२.७ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.