मराठी सिनेसृष्टीत बऱ्याच कलाकारांनी चाहत्यांसह आनंदाची बातमी शेअर केली. एकामागोमाग एक कलाकार मंडळी त्यांच्या लग्नाच्या, घराबाबत गुडन्यूज देताना दिसत आहेत. मराठी कलाकारांपैकी बऱ्याच कलाकारांनी स्वतःच घर घेतलं असल्याची आनंदाची बातमी शेअर केली. काही दिवसांपूर्वीच ऋतुजा बागवे, प्रसाद ओक, गिरीजा प्रभू, ऋता दुर्गुळे, अक्षय केळकर या कलाकारांनी नवीन घर घेत त्यांच्या नव्या घराची झलक चाहत्यांसह शेअर केली. यापाठोपाठ आता आणखी एका मराठमोळ्या कलाकाराने नवं घर घेतलं असल्याचं समोर आलं आहे. (Mangesh Desai New Home)
अभिनेते, निर्माते मंगेश देसाई यांनी नवं घर घेतलं असल्याची खुशखबर त्यांनी चाहत्यांसह सोशल मीडियावरुन शेअर केली आहे. सध्या मंगेश देसाई आनंद दिघे यांच्या जीवनपटावर आधारित असलेल्या ‘धर्मवीर २’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात व्यस्त असल्याचे दिसत आहेत. लवकरचं हा भव्य चित्रपट मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घालण्यास सज्ज होणार आहे. चित्रपट प्रदर्शनाआधी मंगेश यांनी त्यांच्या चाहत्यांसह एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. मंगेश यांनी नवं घर घेतलं असल्याची पोस्ट त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केली आहे.
मंगेश देसाईने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन नव्या घरात गृहप्रवेश केल्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मंगेश यांनी त्यांच्या नव्या घराची नेमप्लेट दाखवली आहे. सुंदर अशा फुलांनी सजवलेल्या या नेमप्लेटने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या नेमप्लेटवर मंगेश शलाका साहिल देसाई हे नांव पाहायला मिळत आहे. यावेळी व्हिडीओमध्ये मंगेश देसाई त्यांच्या पत्नी व मुलासह पाहायला मिळत आहेत. नव्या घराच्या या नेमप्लेटने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ही पोस्ट शेअर करत त्यांनी कॅप्शन देत म्हटलं आहे की, “आज मी खूप खुश आहे, तुम्हीसुद्धा माझ्यासाठी खुश असाल ना”.
आज गणेशजयंतीचे औचित्य साधत मंगेश यांनी त्यांच्या नव्या घरात गृहप्रवेश केलेला पाहायला मिळत आहे. यावेळी देसाई कुटुंबीय पारंपरिक अंदाजात दिसले. त्यांच्या या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळत आहे. शिवाय कलाकार मंडळींसह चाहत्यांनाही त्यांच्या या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव केलेला पाहायला मिळत आहे.