मराठी अभिनेते किरण माने हे नेहमी चर्चेत असतात. त्यांनी आपल्या अभिनयाने सगळ्यांचीच मनं जिंकून घेतली आहेत. आजवर ते अनेक मराठी चित्रपट व मालिकांमध्ये दिसून आले आहेत. त्यांच्या अभिनयला प्रेक्षकांची खूप पसंतीदेखील मिळतात दिसते. मनोरंजनाबरोबरच ते सोशल मीडियावरदेखील अधिक सक्रिय असलेले पाहायला मिळतात. सोशल मीडियाच्या माध्यामातून अनेक मतंदेखील किरण मांडताना दिसतात. सध्या ते राजकारणात सहभागी असलेले दिसत आहेत. ठीकठिकाणी होणाऱ्या घडामोडींवर ते भाष्यदेखील करताना दिसतात. अशातच त्यांची नुकतीच केलेली पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. (Kiran mane social media post)
सरकारकडून जनतेसाठी विविध योजना आखल्या जातात. सध्या ‘लाडकी बहीण’ ही योजना मुली व महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत मुली व महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. मात्र त्यावर आता किरण यांनी आक्षेप घेतला आहे. देशभरात महिलांच्या बाबतीत जे प्रकार घडत आहेत त्यावरुन महिलांनी सरकारचे ‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे परत देण्याचा निर्णय घेतला. तसेच बंद बेकायदेशीर झाल्यावरुनदेखील त्यांनी राग व्यक्त केला आहे. आता त्यावरच त्यांनी भाष्य केले आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हंटले आहे की, “लाडक्या बहिणींनो पैसे परत करु नका. ते पैसे आपलेच आहेत त्यांच्या खिशातील नाहीत”.
पुढे त्यांनी लिहिले की, “ते पैसे आपल्याला देण्यामागे त्यांचा जो उद्देश आहे तो साध्य होऊ देऊ नका. या भुरट्यांना मतं देऊ नका. ठेचायची असेलच तर नांगी ठेचा नको तिथे घाव घालायचा नाही. पैसे घ्या पण मत देऊ नका. हेच आपले आंदोलन आणि हाच आपला बंद. विषय कट”.
आणखी वाचा – गणेशोत्सवात एकच गाणं वाजणार!, ‘बाप्पा आमचा आला’ लवकरच तुमच्या भेटीला, पोस्टर प्रदर्शित
तसेच त्यांनी ही पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “आंदोलन केले की अटक. बंद केला की सदावर्ते कपट. मुस्कटदाबी, दडपशाही किती दिवस खपवून घेणार? स्वातंत्र्यावरचा घाला किती सहन करणार? आपल्याला संविधानाने एक जालीम उपाय दिला आहे त्याचा योग्य वापर करा”. दरम्यान त्यांनी महिलांच्या सुरक्षेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.