जावेद अख्तर व सलीम खान यांची डॉक्युमेंट्री सीरिज ‘अँग्री यंग मेन’ या दोघांच्या करिअर व वैयक्तिक आयुष्याबद्दल भाष्य करणारी आहे. याद्वारे जावेद अख्तर, सलीम खान यांच्या चाहत्यांना त्यांच्या जुन्या दिवसांबद्दल माहिती मिळू शकते. जावेद व सलीम ही जोडी बॉलिवूड सिनेविश्वात खूप गाजली होती. या डॉक्युमेंट्री सीरिजच्या तिसऱ्या भागात, जावेद अख्तर यांनी त्यांची पहिल्या लग्नाबद्दल भाष्य केलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी हनी इराणीबद्दल त्यांची मनात अपराधीपणाची भावना असल्याचे कबूल केले. ते म्हणाले की, लग्न यशस्वी न होण्यासाठी अधिक जबाबदार ते स्वतःला मानतात. सुमारे ६०-७० टक्के अपराधी ते स्वतःला मानतात. (Javed Akhtar On First Marriage)
जावेद अख्तर यांनी कबूल केले की, जर त्यांच्याकडे आज जी समज आहे ती असती तर त्यांच्या पहिल्या लग्नाबाबत परिस्थिती काहीशी वेगळी असती. त्याचवेळी जावेद अख्तरची दुसरी पत्नी शबाना आझमी यांनीही जावेद अख्तरबरोबर नवीन नात्याचा विचार केला होता, ज्यात मुलेही सहभागी होती. त्यांनी कबूल केले की अशी परिस्थिती अतिशय वैयक्तिक व वेदनादायक असतात. यामुळे त्यांना कोणी घर तोडणारा किंवा घराचा नाश करणारा असेही म्हटले.
शबाना आझमी यांनी जावेद अख्तर यांची पहिली पत्नी हनी इराणी यांना श्रेय दिले की त्यांनी आपल्या मुलांना त्यांच्या विरोधात वळवले नाही. हनीने मुलांना सुरक्षा प्रदान करण्यात कोणतीही कसर पडू दिली नाही. आणि त्यामुळेच मुलांनी शबानाकडे केव्हाही सावत्र आईच्या नजरेने पाहिले नाही. शबाना व हनी यांचेही एकमेकांशी चांगले संबंध आहेत.
हनी इराणी व जावेद अख्तर यांचा विवाह १९७२ मध्ये झाला होता आणि त्यांना फरहान अख्तर, झोया अख्तर ही दोन मुले आहेत. फरहान एक बॉलिवूड अभिनेता आहे आणि त्याने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. तर झोया अख्तर ही एक प्रसिद्ध चित्रपट निर्माती आहे. १९८४ मध्ये हनी व जावेद यांचा घटस्फोट झाला. यानंतर जावेदने शबाना आझमीशी लग्न केले.