बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा ‘जवान’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी जगभरात प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. अनेक वर्ष मोठ्या पडद्यापासून दूर राहिल्यानंतर शाहरुखने यावर्षी दोन चित्रपट आणत दमदार पुनरागमन केले असून त्याच्या दोन्ही चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. (Kiran Mane latest post on Shah Rukh Khan)
‘मुलगी झाली हो’ व ‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रमांमधून घराघरात पोहोचलेले अभिनेते किरण माने सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. अभिनयाबरोबरच सोशल मीडियावर ते विविध मुद्द्यांवर आपलं मत व्यक्त करत असतात. अशीच एक पोस्ट किरण यांनी नुकतीच पोस्ट केली असून त्यांची ही पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
‘द काश्मीर फाईल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी काही दिवसांपूर्वी शाहरुखबद्दल एक वक्तव्य केले होते. त्यांच्या या विधानाला मराठी अभिनेते किरण माने यांनी सोशल मीडियाद्वारे उत्तर देत त्यांना अप्रत्यक्षरीत्या टोला लगावला. शिवाय त्यांनी या पोस्टमधून शाहरुखचे तोंडभरून कौतुक केले आहे.
हे देखील वाचा – “राजकारण आपल्या जागी पण…”, सुप्रसिद्ध मराठी दिग्दर्शकाच्या घरी पोहोचले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, म्हणाला, “त्यांची तब्येत ठिक नव्हती तरी…”
किरण माने यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शाहरुख खानचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत ते म्हणाले, “न झुकता पाठीचा कणा कुठं ताठ ठेवायचा आणि कुठं नम्रपणे झुकायचं, हे ज्याला कळलं… त्यानं जग जिंकलं ! परवा एका ‘सी’ ग्रेड सिनेमा दिग्दर्शकाचा इंटरव्ह्यू पाहिला. ज्यात तो सांगत होता शाहरूख कधी कुणाला नमस्कार करत नाही, ‘सलाम’ करतो. आणि हा प्रसंग डोळ्यापुढे आला. आजकाल असत्य पेरून नफरत पसरवणारे सुमार दर्जाचे कलावंत मराठीतही आहेत आणि हिंदीतही. अशांनी गढुळ केलेल्या कलाक्षेत्रात शाहरूखसारखे लोक ‘प्युरीफायर’ आहेत. लब्यू शाहरुख.”
हे देखील वाचा – “परवा पर्यंत रागंत होती मग…”, ‘आई कुठे काय करते’मधील छोट्या जानकीसाठी मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले, “कोणाला कळलंच नाही की…”
‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील विलास पाटील या पात्रामुळे किरण माने प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले होते. मात्र, मालिकेदरम्यान ते एका वादात अडकले आणि अखेर त्यांनी मालिकेला रामराम केला. त्यानंतर ते ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वत झळकले. तेव्हापासून त्यांच्या लोकप्रियतेत वाढ झाली. सध्या किरण ‘सिंधुताई माझी माई – गोष्ट चिंधीची’ या मालिकेत सिंधुताईंचे वडील अभिमान साठे यांची भूमिका साकारताना दिसत आहे.