शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“परवा पर्यंत रागंत होती मग…”, ‘आई कुठे काय करते’मधील छोट्या जानकीसाठी मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले, “कोणाला कळलंच नाही की…”

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 23, 2023 | 5:33 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
milind gawali share a video with the child artist Janaki

milind gawali share a video with the child artist Janaki

‘आई कुठे काय करते’ ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील कथेत वेळोवेळी येणारी वळणं प्रेक्षकांना या मालिकेशी जोडून ठेवण्यास भाग पाडते. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांना आपल्या कुटुंबातील सदस्य असल्यासारखे भासतात. त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या लाडकीची आहेत. या मालिकेतील कालाकार सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात. सेटवरील मजामस्तीचे व्हिडिओ, फोटोज् ते नेहमी सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. या मालिकेतील अनिरुद्ध हे पात्र साकारणाऱ्या अभिनेता मिलिंद गवळी यांनी नुकताच असाच सेटवरील एक मजामस्ती करत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. मालिकेतील जानकी या लहान बाळासोबत खेळताना दिसत आहे. (milind gawali share a video with the child artist)

या व्हिडिओला कॅप्शन देत ते लिहीतात, ‘त्विशा म्हणजेच आमच्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील छोटंस पिल्लू जानकी. अगदीच काही महिन्याची असताना ती आमच्या सिरीयलमध्ये आली. अगदी एखाद्या घरामध्ये लहान बाळ जन्माला येतं तसंच सगळ्यांना वाटतं. आपल्या घरामध्ये कसं लहान मुलाच्या खाण्यापिण्याच्या, झोपायच्या वेळा सगळं सांभाळलं जातं. तसंच त्विशाच्या बाबतीतही तसंच सगळं पाळलं जातं. मध्येच एखादा असिस्टंट धावत यायचा त्विशा उठली आहे. आता ती छान खेळते आहे, हे सांगायला. मग बाकीचे जे शूटिंग चालू असायचं ते थांबून तिच्या सिनचं शूटिंग सुरु करायचे. तिचीही सेटवरच्या सगळ्यांसह ओळख झाली असल्यामुळे सगळ्यांकडे ती छान पद्धतीने रमते. महिन्यात न एखाद दुसरा दिवस तिचं शुटिंग असायचं. त्यादिवशी सेटवर एक वेगळच चैतन्य पसराचं. बहुतेक सगळेच प्रौढ, लहान मुलासारखं बोलायला लागायचे. ज्या सीनमध्ये ती असेल तो सीन कसा होईल ते कोणालाच ठाऊक नसायचं. कारण तिचा mood असेल त्या पद्धतीनेच ते शूटिंग व्हायचं”.

View this post on Instagram

A post shared by Milind Gawali (@milindgawali)

आणखी वाचा – ‘डॉन ३’मध्ये शाहरुख खान का नाही?, अखेर मिळालं उत्तर, फरहान अख्तरचा मोठा खुलासा, म्हणाला, “दोघंही वेगळे झालो कारण…”

पुढे तो लिहीतो, “सिरियलमध्ये माझ्या वाटेला तीचे सीन फार कमी आले आहेत. पण ज्या ज्या वेळेला ते आले त्या त्या वेळेला मला तो सीन करायला खूपच मजा आली. आपण शूटिंग करतो, असं वाटायचं नाही. लहान मुलाबरोबर लहान मुलासारखं आपण खेळतोय असंच वाटायचं. खरं तर अनिरुद्ध देशमुखला या गोष्टींची फार गरज असते. पण काल त्विशाबरोबर माझा सीन होता. हल्ली ती ज्या पद्धतीने धावते, पळते. एका जागेवर स्वस्त बसत नाही. अख्या सेटवर ती फिरत असते. कधी कधी तिला कडेवर घेऊन बसवावं लागतं. काल अचानक तिचे ‘आई कुठे काय करते’ मध्ये सुरुवातीचे दिवस आठवले आणि लक्षात आलं की एक वर्ष निघून कसं गेलं ते कोणाला कळलच नाही. परवा परवापर्यंत रांगत होती. मग चालायला शिकली आणि आता चक्क धावते. लहान बाळं परमेश्वराची रुपं असतात असं म्हणतात ते काय खोटं नाही. तिला उदंड आयुष्या यश आरोग्य, सुख, समृद्धी सर्व काही मिळो हीच त्या परमेश्वराकडे प्रार्थना!, या पोस्टला भलंमोठं कॅप्शन देत त्यांनी सेटवरची मजामस्ती सांगितली. लहान मुलांचा निरागसपणा व सेटवरील त्विशाच्या सगळ्या आठवणींना उजाळा दिला.

View this post on Instagram

A post shared by Milind Gawali (@milindgawali)

आणखी वाचा – Parineeti Chopra Raghav Chadha Wedding राघव चड्ढाची लग्नमंडपात होणार ग्रँड एण्ट्री, लाखो रुपयांचा खर्च, लग्नापूर्वीच्या विधींसाठी नटली परिणीती चोप्रा

नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट व लाईकचा वर्षाव केला. एका नेटकऱ्याने खूप गोड आहे असं लिहीलं आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्याने कमेंट केली की, तिला काजळ लावा आणि तिची दृष्ट काढा, असं म्हणत दृष्ट काढण्यास सुचवलं आहे.

Tags: aai kuthe kay karteJanakimarathi serialmilind gawali
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
CM Eknath Shinde visits Director Viju Mane Home

"राजकारण आपल्या जागी पण…", सुप्रसिद्ध मराठी दिग्दर्शकाच्या घरी पोहोचले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, म्हणाला, "त्यांची तब्येत ठिक नव्हती तरी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.