Comedian Kabir Kabeezy Singh Passes Away : प्रसिद्ध कॉमेडियन आणि ‘अमेरिकाज गॉट टॅलेंट’ स्टार कबीर ‘कबीजी’ सिंगचे निधन झालं असल्याचं समोर आलं आहे. वयाच्या ३९ व्या वर्षी कॉमेडियन मृतावस्थेत आढळला. अभिनेता, कॉमेडियनचा मृतदेह त्याच्या सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया येथील घरात सापडला. पोलिस त्याच्या आकस्मिक मृत्यूचा तपास करत आहेत. अशातच त्याच्या एका मित्राने त्याचा झोपेत मृत्यू झाल्याचे सांगितले. तर काहीजण असंही बोलत आहेत की, कबीरचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाला. कुटुंबीय व पोलिस अधिकारी टॉक्सिकॉलॉजीच्या अहवालाची वाट पाहत आहेत. कबीर सिंग यांचे सॅन फ्रान्सिस्को बे परिसरात निधन झाले.
टीएमझेडच्या वृत्तानुसार, ‘फॅमिली गाय’ मधील भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेल्या या कॉमेडियनने २०२१ मध्ये ‘अमेरिकाज गॉट टॅलेंट’द्वारे विशेष प्रसिद्धी मिळवली, जिथे त्याने भारताला अभिमान वाटून आपली छाप पाडली. या शोमध्ये तो उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला होता आणि त्याच्या कामासाठी त्याला चांगलीच पसंती मिळाली होती. जादूगार डस्टिन टवेला अमेरिकेच्या गॉट टॅलेंटच्या सीझन १६ चा विजेता ठरला.
आणखी वाचा – तारीख ठरली! ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाड व वैष्णवी कल्याणकर ‘या’ दिवशी अडकणार लग्नबंधनात
दिवंगत कलाकाराचे मित्र जेरेमी करी यांनी कबीरचा झोपेत मृत्यू झाल्याचा खुलासा केला आहे. फेसबुक स्टोरीवर एका निवेदनाद्वारे त्यांनी ही माहिती दिली आहे. कबीर सिंग यांचे जवळचे मित्र जेरेमी करी यांनीही त्यांना फेसबुकवर श्रद्धांजली वाहिली आहे. कबीर ‘कबीजी’ सिंह यांच्या निधनाचे वृत्त येताच कॉमेडी जगतातील लोक आणि त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. दिवंगत कॉमेडियनला सोशल मीडियाद्वारे प्रत्येकजण श्रद्धांजली वाहत आहे. स्टँड-अप मारियो सालाझार यांनी देखील त्यांच्या माजी पोस्टमध्ये कबीरला श्रद्धांजली वाहिली.
पोर्टलँडमध्ये भारतीय पालकांच्या घरी जन्मलेल्या कबीर सिंग यांना विनोदाची आवड तेव्हाच सापडली जेव्हा ते फक्त नऊ वर्षांचे होते आणि त्यांचे कुटुंब मुंबईला परत गेले. कबीरला अनेकदा अमेरिकन मूल म्हणून छेडले जायचे आणि त्यामुळे त्याने संवाद साधण्यासाठी तीन वेगवेगळ्या भाषांवर प्रभुत्व मिळवले. वयाच्या १३ व्या वर्षी ते पुन्हा अमेरिकेत गेले. भारतीय-अमेरिकन असल्यामुळे दोन्ही देशांमध्ये तो त्याच्या कॉमेडीसाठी चर्चेत असतो.