रविवार, ऑगस्ट 30, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

तारीख ठरली! ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाड व वैष्णवी कल्याणकर ‘या’ दिवशी अडकणार लग्नबंधनात

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 7, 2024 | 10:14 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Kiran Gaikwad and Vaishnavi Kalyankar Wedding

तारीख ठरली! 'देवमाणूस' फेम किरण गायकवाड व वैष्णवी कल्याणकर 'या' दिवशी अडकणार लग्नबंधनात

Kiran Gaikwad and Vaishnavi Kalyankar Wedding : मराठी सिनेविश्वात अनेक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकत आहेत. सोशल मीडियावर या कलाकारांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. अशातच आणखी एका कलाकार जोडीने जाहीर प्रेमाची कबुली देत लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं सांगितलं. प्रेक्षकांची ही लाडकी जोडी म्हणजे अभिनेता किरण गायकवाड व अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर. किरण व वैष्णवी यांनी सोशल मीडियावर थेट प्रेमाची कबुली देत सुखद धक्का दिला. देवमाणूस फेम या जोडीने लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं सांगितलं. प्रेमाची कबुली दिल्यानंतर आता ही जोडी केव्हा लग्नबंधनात अडकणार याची साऱ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. अशातच किरण व वैष्णवी यांच्या लग्नाची तारीख अखेर समोर आली आहे.

किरण व वैष्णवी येत्या १४ डिसेंबर २०२४ ला लग्नबंधनात अडकणार असल्याचं समोर आलं आहे. वैष्णवी कल्याणकरने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीला टॅग केलेली एक स्टोरी पोस्ट केली आहे. यामध्ये वैष्णवीचं अभिनंदन केलं आहे. आणि त्याखाली १४-१२-२४ ही तारीख लिहीत सेव्ह द डेट असं लिहिलं आहे. #weddingvibes असा हॅशटॅगही यावेळी वापरला आहे. यावरुन किरण व वैष्णवी येत्या १४ डिसेंबरला बोहोल्यावर चढणार आहेत. किरण व वैष्णवीच्या लग्नाची तारीख समोर आली असून सगळ्यांच्या नजरा आता त्यांच्या लग्नाकडे लागून राहिल्या आहेत.

आणखी वाचा – मुलीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये पोहोचली दीपिका पदुकोण, स्टेजवर थिरकताना दिसली अन्…

“तू काही संगीतकार नाहीस आणि गायक पण नाहीस पण तरीही मी संपूर्ण आयुष्य तुझ्या चालीवर चालायच ठरवलं आहे. मंत्री मंडळातल्या बैठका होत राहतील. मंत्री पद वाटत राहतील, त्यांचं ठरतंय तोपर्यंत आपलं ठरलेलं सगळ्यांना सांगून टाकतो. ही आहे माझी होणारी ‘होम मिनिस्टर’ वैष्णवी कल्याणकर”, असं कॅप्शन देत किरणने वैष्णवीबरोबरच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. त्यांच्या या जाहीर कबुलीनंतर सिनेविश्वातून आणि चाहतेमंडळींकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झालेला पाहायला मिळाला.

आणखी वाचा – Paaru Marathi Serial : पारू आदित्यपासून दुरावणार का?, अनुष्काची चाल यशस्वी, दोघांच्या मैत्रीत फूट पाडली अन्…; प्रोमो समोर

किरण व वैष्णवी यांनी ‘देवमाणूस २’ मध्ये एकत्र काम केले होते. वैष्णवी देखील मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा असून तिने ‘देवमाणूस २’, ‘तू चाल पुढं’, ‘टिकली’ या मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण काम केले आहे. शिवाय ती ‘बांबू’ या चित्रपटातही झळकली. तर ‘देवमाणूस’ या मालिकेमुळे किरण गायकवाडला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. याशिवाय किरणने चित्रपटांमधूनही प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.

Tags: Kiran Gaikwad and Vaishnavi KalyankarKiran Gaikwad and Vaishnavi Kalyankar Weddingmarathi celebrity
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Telugu actor GV Narayana Rao Death
Entertainment

ज्येष्ठ तेलुगू अभिनेते वयाच्या ७३ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड, चिरंजीवींनी वाहिली श्रद्धांजली

ऑगस्ट 28, 2026 | 10:35 am
Kapuskonda Movie
Entertainment

‘कापूसकोंडा’मुळे सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले पुन्हा एकत्र, २३ ऑक्टोबरला सिनेमागृहात

ऑगस्ट 28, 2026 | 10:02 am
Bandhu Marathi Movie
Entertainment

राम-लक्ष्मणाच्या अतूट बंधाची आठवण करून देणारा ‘बंधू’, उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी पहिल्यांदा एकत्र

ऑगस्ट 27, 2026 | 3:07 pm
Next Post
Comedian Kabir Kabeezy Singh Passes Away

‘अमेरिकाज गॉट टॅलेंट’ फेम कॉमेडियन कबीर सिंगचे वयाच्या ३९व्या वर्षी निधन, राहत्या घरात सापडला मृतदेह, मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.