मराठी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेता दिग्दर्शक हेमंत ढोमे व अभिनेत्री क्षिती जोग. हेमंत व क्षिती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. अभिनयाबरोबरच हेमंत व क्षिती यांनी दिग्दर्शन व निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकलेलं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करणाऱ्या ‘झिम्मा २’ या चित्रपटाने साऱ्यांची मनं जिंकली. हेमंतने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती, तर क्षितीने अभिनय व निर्माती अशी दुहेरी बाजू सांभाळली. (Hemant Dhome Story)
हेमंत व क्षिती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांना अपडेट देत असतात. अशातच हेमंतने इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केलेल्या एका स्टोरीने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हेमंत व क्षिती यांचा प्रेमविवाह आहे. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केले. क्षिती ही प्रसिद्ध अभिनेते अनंत जोग व अभिनेत्री उज्ज्वला जोग यांची मुलगी आहे. लेकीला भेटण्यासाठी क्षितीचे आई-बाबा त्यांच्या घरी आले असतानाचा एक फोटो हेमंतने इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे.
हेमंतने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवरुन त्यांच्या सासू-सासऱ्यांबरोबरचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत हेमंतने या फोटोला दिलेल्या कॅप्शनने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. “सासू-सासरे येती घरा तोचि दिवाळी दसरा”, असं कॅप्शन देत त्याने हा फोटो पोस्ट केला आहे. हेमंतची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. समोर आलेल्या फोटोमुळे हेमंतचे त्याच्या सासू-सासऱ्यांबरोबरचे बॉंडिंग दिसून येत आहे.
सासू-सासरे घरी आल्याच्या आनंदात हेमंतने शेअर केलेला हा फोटो साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. हेमंत व क्षिती दोघेही कामाबरोबरच एकमेकांना नेहमीच वेळ देताना दिसतात. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्येही दोघांचं खास बॉण्डिंग नेहमीच पाहायला मिळत. कामाबाबत बोलायचं झालं तर, हेमंत दिग्दर्शन व अभिनयक्षेत्रात कार्यरत आहे. तर क्षिती मराठीसह बॉलिवूडक्षेत्रातही कार्यरत आहे.