शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तीन हत्ती, झोका तुटेल”, झोपाळ्यावरील व्हिडीओ पाहून सई-मेघा-शर्मिष्ठाला वजनावरुन लोकांनी हिणावलं, रागात अभिनेत्री म्हणाली, “पायाखाली चिरडला…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 22, 2024 | 12:43 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sai Lokur And Megha Dhade Troll

"तीन हत्ती, झोका तुटेल", झोपाळ्यावरील व्हिडीओ पाहून सई-मेघा-शर्मिष्ठाला वजनावरुन लोकांनी हिणावलं, रागात अभिनेत्री म्हणाली, "पायाखाली चिरडला..."

मराठी सिनेसृष्टीतील ‘बिग बॉस’ हा वादग्रस्त शो कायमच चर्चेत राहिला. ‘बिग बॉस’ मराठीमुळे अनेक कलाकारांना उत्तम असा प्लॅटफॉर्म मिळालेला पाहायला मिळाला. या ‘बिग बॉस’मराठीमधील प्रत्येक पर्व विशेष गाजलं. या पर्वातील सिझन एकमधील स्पर्धकांची विशेष चर्चा रंगलेली नेहमीच पाहायला मिळाली. ‘बिग बॉस’च्या या पहिल्या पर्वाच्या विजेतेपदावर मेघा धाडेने नाव कोरले. या सीझनमधील आणखी नेहमीच चर्चेत राहिलेली गोष्ट म्हणजे मेघा धाडे, सई लोकूर, शर्मिष्ठा राऊत यांची मैत्री. (Sai Lokur And Megha Dhade Troll)

‘बिग बॉस’ मराठीच्या पहिल्या सिझनमधील मेघा, सई, शर्मिष्ठा यांची मैत्री विशेष चर्चेत राहिली. अशातच या तीन मैत्रिणींचा एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. मेघाच्या आलिशान अशा व्हिलावर एन्जॉय करतानाचा खास व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. रत्नागिरी येथे असलेल्या मेघाच्या या आलिशान व्हिलावर सई लोकूर व शर्मिष्ठा राऊत आपल्या पतीसह सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी गेल्या होत्या. तेथील त्यांचे अनेक फोटो व व्हिडीओ तुफान व्हायरल झाले आहेत.

आणखी वाचा – ५१ वर्षांचा संसार, एकमेकांवर जीवापाड प्रेम अन्…; वंदना गुप्तेंनी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त नवऱ्यासह शेअर केला रोमँटिक फोटो, म्हणाल्या, “इतकी वर्ष…”

View this post on Instagram

A post shared by Sai Lokur (@sai.lokur)

मेघाच्या व्हिलामधील झोक्यावर झुला घेताना या तीन मैत्रिणींचा एक व्हिडीओ सईने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून अभिनेत्रींना अनेकांनी त्यांच्या वजनावरुन ट्रोल केलेलं पाहायला मिळत आहे. वजनावरून ट्रोल करताच मेघाने या नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर देत त्यांची बोलतीच बंद केली आहे.

आणखी वाचा – समुद्रकिनारी रोमान्स, पारंपरिक लूक अन्…; लग्नाला दोन महिने पूर्ण होताच मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटेने शेअर केला सर्वात सुंदर व्हिडीओ, रंगतेय चर्चा

या व्हिडीओवर कमेंट करत एका नेटकऱ्याने लिहिलं आहे की, “झोका तुटेल. तीन हत्ती”, असं म्हटलं आहे. या नेटकऱ्याला उत्तर देत मेघा म्हणाली, “झोक्याची काळजी करु नकोस स्वतःची कर. उगाच समोर आलास तर पायाखाली चिरडला जाशील म्हणून म्हटलं उंदरा”. तर आणखी एकाने, “काय खाऊन एवढा जाड्या झालात सई आणि मेघा”, असं म्हणताच मेघाने उत्तर देत म्हटलं की, “काय खाऊन ते माहित नाही. पण तुझ्या पिताश्रींचं नक्कीच नाही”. तर आणखी एका युजरने “तुटेल ते”, अशी कमेंट केली आहे. यावर उत्तर देत मेघा म्हणाली, “काळजी करु नकोस झुला व आमची मैत्री मजबूत आहे. कधीच तुटणार नाही”, असं म्हटलं आहे.

Tags: bigg boss season 1entertainmentmarathi actressmegha dhadesai lokurSai Lokur And Megha Dhade Troll
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Bhushan Kumar And Divya Khossla Divorce Rumors

दिव्या खोसला व टी-सीरिजचे सर्वेसर्वा भूषण कुमार यांचा १९ वर्षांचा संसार मोडणार?, ज्योतिषाने 'ती' गोष्ट सांगता 'तो' निर्णय घेतला अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.