सिनेसृष्टीत सध्या लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. एकामागोमाग एक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकत असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या प्रथमेश परबच्या लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे. तर काही दिवसांतच तितीक्षा तावडे व सिद्धार्थ बोडके ही जोडीही लग्नबंधनात अडकणार आहे. तर आणखी एका लोकप्रिय अभिनेत्रीच्या घरीही लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. ही मराठमोळी, लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत. (Pooja Sawant Wedding)
पूजा सावंतने तिच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर म्हणजेच सिद्देश चव्हाणसह रिंग फ्लॉन्ट करतानाचे पाठमोरे फोटो शेअर करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यानंतर अभिनेत्रीने तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा दाखवत लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची आनंदाची बातमी शेअर केली. अभिनेत्रीचं अरेंज-मॅरेज असून लवकरच पूजा लगीनगाठ बांधणार आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीचा शाही साखरपुडा समारंभ थाटामाटात पार पडला. पूजाच्या साखरपुड्यातील फोटो, व्हिडीओ पाहून प्रेक्षकांनी भरभरुन पसंती दर्शविली.
अशातच अभिनेत्रीने शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पूजाने तिच्या कुटुंबासह सासरच्या कुटुंबीयांची भेट घेत काही फोटो शेअर केले आहे. चव्हाण व सावंत कुटुंब एकत्र आलेले हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पूजाने शेअर केलेल्या या फोटोवरुन तिच्या लग्नापुर्वीच्या विधींना सुरुवात झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. पूजाने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये मानापमानाचा विधी पार पडताना दिसत आहे.
पूजाच्या लग्नासाठी सध्या त्यांची जोरदार तयारी सुरु झालेली पाहायला मिळत आहे. तसेच पूजाच्या संगीत सोहळ्यासाठीही त्यांची तयारी सुरु झाली आहे. दरम्यान पूजा व सिद्देशचा साखरपुड्यातील लूक विशेष चर्चेत राहिलेला पाहायला मिळाला. पूजाच्या साखरपुड्याला अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, भूषण प्रधान, वैभव तत्ववादी, गश्मीर महाजनी, गौरी महाजनी, श्रेयस सावंत, रुचिरा सावंत, सौमिल शृंगारपुरे, फुलवा खामकर यासंह अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. आता सगळेचजण पूजा व सिद्देशच्या लग्नसोहळ्याची वाट पाहत आहेत.