‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली राणादा आणि पाठक बाई यांची जोडी प्रेक्षकांच्या आवडत्या जोडीपैकी एक आहे. आजवर राणादा म्हणजेच हार्दिक जोशी आणि पाठक बाई म्हणजेच अक्षया देवधर यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांचं कायमच मनोरंजन केलं आहे. या मालिकेमुळे या जोडीला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. मालिकेतील या जोडीचा जसा प्रवास सुरु होता तो प्रवास संपल्यानंतर ही जोडी खऱ्या आयुष्यातही एकत्र आलेली पाहायला मिळाली. हार्दिक व अक्षया यांनी लग्न केलं त्यादरम्यान दोघांच्या लग्नाची बरीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. (Hardik Joshi shared Goodnews)
चाहत्यांनाही ही जोडी खऱ्या आयुष्यात एकत्र आल्यानंतर खूप आनंद झाला. अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. हार्दिक व अक्षया सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच काही ना काही शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अशातच हार्दिकने शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतले. हार्दिक व अक्षयाने चाहत्यांसह एक गुडन्यूज शेअर केली आहे. नेमकी ही गुडन्यूज काय आहे याकडे साऱ्यांच्या नजरा वळल्या आहेत. तर हार्दिकने वडिलांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देत खास भेटवस्तू दिली आहे. हार्दिकने नवी कोरी महागडी कार त्याच्या बाबांना भेट म्हणून दिली आहे.
कुटुंबाचा गाडीबरोबरचा फोटो शेअर करत त्यांनी ही बातमी सोशल मीडियावरुन चाहत्यांसह शेअर केली आहे. यावेळी हार्दिकचे आई-बाबा, अक्षया, हार्दिकचा भाऊ आणि त्याची पुतणीदेखील पाहायला मिळाली. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. हार्दिकच्या पोस्टवर अनेकांनी त्यांचं भरभरुन कौतुक केलं. सध्या हार्दिक व अक्षया त्यांचे लग्नानंतरचे दिवस एन्जॉय करताना दिसत आहेत. होळी स्पेशल पोस्टमध्येही त्यांनी अत्यंत साध्या पद्धतीने व कमी रंगांची उधळण करत होळी साजरी केली.
हार्दिकच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, काही दिवसांपूर्वी आलेल्या जाऊबाई गावात या कार्यक्रमात त्यांने सूत्रसंचालकाची भूमिका केली होती. मात्र या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता या कार्यक्रमाचा पुढील भाग केव्हा येणार याकडे साऱ्यांच्या नजरा वळून राहिल्या आहेत. तर अक्षयाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर अक्षयाने लग्नानंतर सिनेसृष्टीतून ब्रेक घेतला आहे. मात्र लग्नानंतर तिने एका चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केलं. अद्याप तो चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आलेला नाही. तर हार्दिक व अक्षया ही जोडी पुन्हा पडद्यावर केव्हा दिसणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.