शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

ताडपत्री ते फ्लॅट!, अभिनेता गौरव मोरेला मिळाली मुंबईतील नव्या घराची चावी, भावुक होत म्हणाला, “फ़िल्टर पाडा ते पवई…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 26, 2025 | 4:44 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
gaurav more buys new home

ताडपत्री ते फ्लॅट!, अभिनेता गौरव मोरेला मिळाली मुंबईतील नव्या घराची चावी, भावुक होत म्हणाला, "फ़िल्टर पाडा ते पवई…"

gaurav more buys new home :असे अनेक कलाकार आहेत जे नेहमीच चाहत्यांसह आनंदाची बातमी शेअर करतात. बरेचदा घर घेतल्याचा, गाडी घेतल्याचा, आई-वडील झाल्याचा आनंद ते चाहत्यांसह शेअर करतात. अशातच आता एका मराठमोळ्या अभिनेत्याने नवं घर घेतल्याचा आनंद चाहत्यांसह शेअर केला आहे. हा आनंद त्या अभिनेत्यासाठी खूप खास आहे. कारण ताडपत्रीच्या घरात राहून दिवस काढल्यानंतर जेव्हा फ्लॅटची चावी हातात येते तो आनंद वेगळाच म्हणायला हवा. हो. हा अभिनेता म्हणजे गौरव मोरे. गौरव सध्या ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात त्याच्या विनोदी अंगाने रसिकांच्या मनात घर करुन आहे.

आजवर गौरवने महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. मात्र त्याने अर्ध्यातूनचा या कार्यक्रमाबरोबरचा प्रवास संपविला. त्यानंतर गौरव चित्रपटांकडे वळला. सध्या गौरव ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. सोशल मिडियावरही गौरव बऱ्यापैकी सक्रिय असतो, नेहमीच तो काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतो. अशातच गौरवने नव्या घराचा ताबा मिळाल्याची गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे.

आणखी वाचा – “शिव्या मिळाव्या म्हणून…”, कमेंटमध्ये शिव्या देणाऱ्याला जुईली जोगळेकरचं सणसणीत उत्तर, म्हणाली, “ही असली थिल्लरगिरी…”

View this post on Instagram

A post shared by Gaurav More (@im_gaurav_more20)

गौरव मोरेचा सिनेविश्वातील प्रवास हा काही सोप्पा नव्हता. फ़िल्टर पाडामधून येत सिनेविश्वात कोणाचाही वारसा नसताना गौरवने स्वतःचा ठसा उमटविला. आता या गौरवचं आणखी एक स्वप्न पूर्ण झालं आहे. गौरवने लहानाचा मोठा झालेल्या फिल्टर पाडामध्येचं स्वतःचं बिल्डिंगमध्ये घर घेतलं, आणि त्याला त्याच्या या नव्या फ्लॅटची चावीही मिळाली. याबाबत पोस्ट शेअर करत तो म्हणाला, “फ़िल्टर पाडा ते पवई हा प्रवास बघताना खूप छोटा वाटतो, पण तो पूर्ण करण्यासाठी खूप वर्ष लागली आहेत. जिथे राहतो तिथेच आपलं घर असाव हे कायम मनात होतं”.

आणखी वाचा – “आपण नवरा-बायको म्हणून पुढे जायला नको”, संसाराच्या सुरुवातीत मोठं विघ्न, पारूचा निर्णय आदित्यला पटणार का?

पुढे त्याने लिहिलं, “लहानपणापासुन वाटत होतं जिथे राहतो तिथेच घर घ्यायचं आणि आज ते स्वप्न खऱ्या अर्थाने सत्यात उतरलं आणि काल दिनांक २५-९-२०२५ रोजी आम्हाला आमच्या पवईच्या नवीन घराचा ताबा मिळाला. ताडपत्री ते फ्लॅट असा हा प्रवास आहे. आणि काल घरच्यांना त्या घराचा आनंद घेताना बघुन मन भरून आलं आणि वाटलं आपण आपल्या परिवारासाठी काहीतरी केलं. माझी नाळ कायम फ़िल्टर पाडा आणि पवई सोबत जोडली गेली आहे आणि ती कधीच तुटणार नाही. माझ हे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल मी म्हाडाचे मनापासुन आभार मानतो”. गौरवच्या या पोस्टवर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Tags: gaurav moremarathi actornew home
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
kamali upcoming twist

'कमळी'च्या टीमनं मारली बाजी, अनिकाची हार होताच झाला संताप; कोणता नवा डाव आखणार?, प्रोमो समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.