Paru Marathi serial latest promo : ‘झी मराठी’ वाहिनीवरील मालिकांना नेहमीच प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत असतो. मालिकाविश्वातील ट्विस्ट अँड टर्न्समुळे प्रेक्षकांची उत्सुकता कायम वाढत असते. मालिकेत पुढे नेमकं काय होणार? आणि मालिकेत कोणता नवीन ट्विस्ट येणार?, असे प्रश्न प्रेक्षकांच्या मनात सतत निर्माण होताना दिसतात. सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘पारू’ ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष चर्चेत आहे. मालिकेतील आदित्य-पारूची ही जोडी प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करत आहे. आता कथानक एका महत्त्वाच्या वळणावर आले आहे. मालिकेत आदित्य आणि पारू यांच्या लग्नाचं गुपित अखेर अहिल्यादेवी किर्लोस्कर यांच्यासमोर आलं आहे.
ही बातमी ऐकताच अहिल्यादेवींचा राग अनावर होतो आणि त्या आदित्य-पारूला घराबाहेर काढतात. ज्यामुळे आदित्य आणि पारू त्यांच्या नव्या संसाराची सुरुवात करण्याचा निर्णय घेतात. आदित्य-पारूने घेतलेला हा मोठा निर्णय आता मालिकेत मोठा ट्विस्ट आणताना दिसत आहे. आदित्य पारूला घेऊन घराबाहेर पडताना त्याचे सर्व लक्झरी जीवन मागे सोडतो. सर्व कार्ड, पैसे हे तो श्रीकांतच्या हातात देतो आणि त्याचे आशीर्वाद घेऊन घराबाहेर पडतो.
आणखी वाचा – “लग्न नाही, कुटुंब नाही…”, फुकटचा सल्ला देणाऱ्याला जुई गडकरीने खडसावलं, म्हणाली, “अशा माणसांची कीव…”
दरम्यान झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर एक नवीन प्रोमो शेअर केला आहे. त्यात आदित्य-पारू नव्या संसाराची सुरुवात करताना दिसत आहेत. पण या दरम्यान पारू नवीन सुरुवात करण्यावर आदित्यला नकार देते आणि म्हणते, “देवीआईंनी आपल्या नात्याचा स्वीकार केलेला नाही. जोपर्यंत त्या स्वीकार करत नाहीत, तोपर्यंत आपण नवरा-बायको म्हणून पुढे जायला नको”. यावर आदित्यही तिच्या निर्णयाला होकार देताना दिसतो.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध गायिका तिसऱ्यांदा झाली आई, लेकीचा चेहराही दाखवला; नावंही ठेवलं खास
दरम्यान, पुढे अहिल्यादेवींच्या रागामुळे त्या आदित्यकडून दिलेली सर्व अधिकारही हिसकावून घेतो, ज्यामुळे आदित्य फारच दुखावलेला दिसतो. तर आता प्रश्न असा की, अहिल्यादेवी आदित्य-पारूच्या लग्नाचा स्वीकार करतील का? आणि जर स्वीकार केला नाहीतर आदित्य-पारू त्यांचा संसार सुरु करतील का?, दोघांचा आता प्रवास पुढे कसा असणार हे येत्या काही दिवसांत पाहायला मिळणार आहे.





