शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘कमळी’च्या टीमनं मारली बाजी, अनिकाची हार होताच झाला संताप; कोणता नवा डाव आखणार?, प्रोमो समोर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 27, 2025 | 11:00 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
kamali upcoming twist

'कमळी'च्या टीमनं मारली बाजी, अनिकाची हार होताच झाला संताप; कोणता नवा डाव आखणार?, प्रोमो समोर

kamali upcoming twist : मालिकाविश्वातील अनेक मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. मालिकांमधील नवनवीन ट्रक नेहमीच प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेताना दिसतात. यादरम्यान झी-मराठीवरील ‘कमळी’ ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. मालिका सुरु झाल्यापासून मालिकेत कमळीच्या भूमिकेने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. गावाकडून शहराकडे अनेक स्वप्न घेऊन आलेल्या कमळीचा खडतर प्रवास मालिकेत पाहायला मिळत आहे. मालिकेच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे मालिकेची TRP देखील वाढताना दिसत आहे. अल्पावधीतच या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे.

मालिकेत कमळी आणि ऋषी यांच्या भूमिकेत दिसणारे अभिनेता निखिल दामले आणि अभिनेत्री विजया बाबर ही जोडी झळकत असून, प्रेक्षकांकडून त्यांना प्रचंड प्रेम मिळत आहे. अलीकडेच झी-मराठीने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक नवीन प्रोमो शेअर केला आहे. त्यात दाखवण्यात आलं आहे की कमळी आणि अनिका यांच्यात कबड्डीची मॅच रंगते. या सामन्यात ऋषी देखील कमळीला सपोर्ट करण्यासाठी मैदानात येतो.

आणखी वाचा – ताडपत्री ते फ्लॅट!, अभिनेता गौरव मोरेला मिळाली मुंबईतील नव्या घराची चावी, भावुक होत म्हणाला, “फ़िल्टर पाडा ते पवई…”

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

अनिकाला कमळीने दिलेला सल्ला मान्य नसतो. तरीही खेळात अनिका कमळीने दिलेला सल्ला वापरते आणि गेम जिंकते. मात्र यासाठी ती कमळीचे साधे आभारही मानत नाही. यानंतर मात्र अनिका कमळीला आणि तिच्या टीमला चॅलेंज देते. शेवटी अनिकाला धडा शिकवण्यासाठी कमळी मैदानात उतरते. आणि या खेळादरम्यान कमळी जखमी होते, पण तरीही ती हार मानत नाही आणि पूर्ण ताकदीने सामना खेळते. तिच्या टीमचे डेडिकेशन पाहून अनिकाला मात्र टेन्शन येतं.

आणखी वाचा – “शिव्या मिळाव्या म्हणून…”, कमेंटमध्ये शिव्या देणाऱ्याला जुईली जोगळेकरचं सणसणीत उत्तर, म्हणाली, “ही असली थिल्लरगिरी…”

प्रोमोमध्ये पुढच्या भागात असं दाखवलं की, कमळी आणि तिची टीम अनिकाच्या टीमवर मात करुन विजय मिळवताना दिसतात. हे पाहून अनिका संतापते. तर आता प्रश्न असा की, कमळीच्या या विजयाचा बदला घेण्यासाठी अनिका कोणता नवा डाव आखेल? कमळीला पुढे कोणत्या संकटांना सामोरं जावं लागेल?, हे सारं पाहणं मालिकेत रंजक ठरेल.

Tags: kamali serialkamali upcoming twistmarathi serial
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Kadambari Mali Interview
Entertainment

“१६ वर्षाचीच मुलगी Lead हवी”, लीडच्या भूमिका न मिळण्यावर मराठी अभिनेत्रीच भाष्य, म्हणाली, “फुकट काम…”

एप्रिल 18, 2026 | 11:00 am
Humidity Infections Summer health issues
Lifestyle

आजकाल तुम्हालाही ताप आणि पोटदुखीचा त्रास होतोय का?, असे होण्यामागचं कारण आहे…

एप्रिल 18, 2026 | 9:50 am
Next Post
Paaru Serial Promo

प्रीतमचा आत्महत्येचा प्रयत्न, पारू-आदित्य जीव वाचवायला येणार का?, मालिकेत मोठा ट्विस्ट

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.