juilee joglekar netizen troller : सध्या नवरात्र विशेष अनेक कलाकारांनी खास सादरीकरण केलेलं पाहायला मिळत आहे. अनेक कलाकारांनी अंबाबाईला साकडं घालत केलेलं नृत्य साऱ्यांच्या मनावर राज्य करत आहे. अशातच अभिनेत्री मिताली मयेकरने गायिका जुईली जोगळेकर आणि नृत्य दिग्दर्शक आशिष पाटीलसह जागरण गोंधळाच्या एका गाण्यावर डान्स केला. सध्या हे गाणं रसिकांच्या मनाचा ठेका घेत थिरकायला भाग पाडत आहे. एखाद्या सुंदर अशा गोष्टीला नेहमीच ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. याचप्रकारे या गाण्याच्या पोस्टमध्ये एका नेटकऱ्याने अर्वाच्च भाषेत एक कमेंट केली. ज्याला गायिका जुईली जोगळेकरने चांगलंच सुनावलं.
‘आई अंबाबाई’ या गाण्याच्या पोस्टमध्ये एका नेटकऱ्याने अपशब्द आणि शिवीगाळ करत चुकीची कमेंट केली होती. “सगळे XXX भरती झालेत गाण्यांमध्ये, देवाच्या गाण्याचा मजाक बनवून ठेवला तुम्ही XXXXX”, अशा वाईट शब्दात कमेंट केली. त्यामुळे चिडलेल्या जुईलीने सडेतोड उत्तर देत या कमेंटचा स्क्रीनशॉट इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.
आणखी वाचा – “आपण नवरा-बायको म्हणून पुढे जायला नको”, संसाराच्या सुरुवातीत मोठं विघ्न, पारूचा निर्णय आदित्यला पटणार का?
“अय्य भाई! भाषा सांभाळ! तुला नाही बघायचंय तर नको बघू… स्क्रोल डाऊन कर. तुला जे काही बोलायचंय ना ते तू पर्सनली मॅसेज करून पण बोलू शकतोस. इथे भक्तीने आणि श्रद्धेने काम केलं आहे. तुमच्यासारखे नल्ले लोक इथे आई अंबाबाईच्या गाण्यावर शिव्या घालत असतील तर ते चालणार नाही. आम्ही आमचं काम कष्ट करून आणि मजा घेऊन करतो. नाचू वाटले तर नाचतो कारण आम्ही क्रिएट केलं आहे ते. आम्ही ते गाणं तुमच्यापर्यंत पोहोचवतोय यातही खूप कष्ट आहेत”.

पुढे जुईली म्हणाली, “तुम्हाला तोंडाला काहीही येईल ते बोलण्यासाठी इथे अंगण दिलेले नाही. काम नसतील तर काम कर. आईचा आशीर्वाद मिळेल. तेव्हाच कलेची कदर करशील, आम्ही कलाकार आहोत. आई सरस्वतीचा हात आहे आमच्यावर ही असली थिल्लरगिरी दुसरीकडे जाऊन कर भावा, इथे नाही…”, असं सडेतोड उत्तर जुईलीने दिलं आहे.
आणखी वाचा – झुबीन गर्गच्या निधनानंतर पत्नीची अशी अवस्था, डोळ्यांत पाणी आणत म्हणाली, “त्याची शेवटची इच्छा…”
हे कमेंटचे स्क्रिनशॉट इंस्टाग्राम स्टोरीला शेअर करत, “आम्ही रसिक मायबाप प्रेक्षकांसाठी कला सादर करतो. गाणं बनवणं ही कला आहे. क्रिएटिव्हीवर शिव्या मिळाव्या? का करतो मग आम्ही हे सगळे?”, असा सवाल गायिकेने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये उपस्थित केला आहे.





