मराठी मनोरंजनसृष्टीत आपल्या अभिनयातून सगळ्यांचं मन जिंकणारा अभिनेता म्हणजे गश्मीर महाजनी. त्याने आजवर बऱ्याच चित्रपटांमध्ये काम करत चाहत्यांच्या मनात स्वतःच वेगळं असं स्थान मिळवलं आहे. ‘देऊळबंद’, ‘कॅरी व मराठी’, ‘डोंगरी का राजा’, ‘कान्हा’, ‘धर्मवीर’ यांसारख्या चित्रपटात त्याने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. हिंदीच्या ‘झलक दिखला जा’ या प्रसिद्ध डान्स कार्यक्रमातून तो प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला. गश्मीर एक उत्तम अभिनेता तर आहेच पण त्याचबरोबर तो उत्कृष्ट डान्सरही आहे. त्याची स्वतःची डान्स अकादमीही आहे. तो बऱ्याचदा तिथले डान्सच्या सरावाचे व्हिडीओ शेअर करताना दिसतो. पण गश्मीर सध्या अभिनय क्षेत्रापासून लांब असलेला पाहायला मिळत आहे. सध्या तो कोणत्याही मालिकेत का दिसत नाही हा प्रश्नही त्याच्या चाहत्यांना पडला आहे. तर त्याचा खुलासा नुकताच त्याने सोशल मीडियावरून केला. (gashmeer mahajani talk about hindi serial offer)
गश्मीर सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. नेहमी तो चाहत्यांबरोबर व्हिडीओ, पोस्टही शेअर करताना दिसतो. तर कधीतरी तो Ask Gash हा सेगमेंट चाहत्यांसोबत ठेवला होता. याआधीही गश्मीरने असे सेगमेंट बऱ्याच वेळा ठेवले होते. त्यावेळीही गश्मीरने चाहत्यांबरोबर मनमोकळेपणाने त्यांच्या प्रश्नांची उत्तरंही देता. आताही त्याला त्याच्या चाहत्यांनी प्रश्न विचारले.त्याचीही तो दिलखुलासपणे उत्तरं देताना दिसला. त्यात त्याला त्याच्या सध्याच्या अभिनय क्षेत्राशी निगडीत प्रश्न विचारण्यात आला, “तेरे इश्क में घायल या मालिकेनंतर तुझ्याकडे हिंदीच्या कोणत्या मालिका आल्या आणि त्या तु केल्या नाहीस?”

या प्रश्नावर उत्तर देताना गश्मीर म्हणाला, “खूप आल्या. आताच्या टॉप मालिकाही ऑफर आल्या होत्या पण थोडी वाट पाहुया”, असं उत्तर देत त्याने सध्या कोणतंही काम का करत नसल्याचं उत्तर दिलं. मधल्या काळात गश्मीरने छत्रपती शिवाजी महाराजांची स्टोरी इन्स्टाग्रामवर पोस्ट केली होती. त्यावरून तो पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार असं म्हटलं जात होतं. त्यानंतर त्याने एक सेशनमध्येही याबाबत बोलला होता. आता तो नव्या कोणत्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे याबाबत सगळ्यांना उत्सुकता लागून आहे.
गश्मीर लहानपणापासून डान्स व अभिनयाची आवड होती. त्यामुळे त्याने त्याच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. २०१०च्या ‘मुस्कुराके देख जरा’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्याचबरोबर त्याने हिंदी, मराठी क्षेत्रात बरेच चित्रपट केले.