Bigg Boss 18 Grand Finale : गेल्या तीन महिन्यांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा रिॲलिटी शो ‘बिग बॉस सीझन १८’ आता शेवटच्या दिशेने वाटचाल करत आहे. या शोमध्ये आलेले सर्व वाइल्डकार्ड स्पर्धक आता बाहेर काढण्यात आले आहेत. आता करणवीर मेहरा, अविनाश मिश्रा, रजत दलाल, शिल्पा शिरोडकर, चाहत पांडे, चुम दरंग, श्रुतिका अर्जुन व विवियन डिसेना हे स्पर्धक घरात उरले आहेत. ट्रॉफीसाठी त्यांच्यात चुरशीची स्पर्धा सुरु आहे. या शोचा ग्रँड फिनाले येत्या दोन आठवड्यांत होणार आहे. हा ग्रँड फिनाले केव्हा आणि कुठे पाहू शकतो आणि विजेत्याला काय मिळणार ते कोण विजेता होऊ शकतो याचे अपडेट समोर आले आहेत. ‘बिग बॉस १८’ हा शो ऑक्टोबर महिन्यात सुरु झाला.
‘बिग बॉस १८’ चा ग्रँड फिनाले १९ जानेवारी २०२५ रोजी होणार आहे. दरवर्षीप्रमाणे, यावेळीही सलमान खान कोणत्याही दोन स्पर्धकांचा हात पकडून एकाला विजेता आणि दुसऱ्याला उपविजेता म्हणून घोषित करेल. यासाठी सध्या फक्त रजत दलाल आणि विवियन डिसेना यांचीच नावे स्पर्धक म्हणून दिसत आहेत. दरम्यान यापैकी एकच स्पर्धक विजयी होण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा – Video : “शिवा आज खऱ्या अर्थानं जिंकली…”, अंध चाहतीच्या भेटीने पूर्वा कौशिक भावुक, गाणंही गायलं अन्…
विजेता कोणीही असेल, तो नक्कीच चमकणारी ट्रॉफी घरी नेईल. तो त्याच्या नावावर रोख बक्षीस देखील जिंकेल, या बक्षिसाची किंमत सुमारे ५० लाख रुपये असू शकते. यामध्ये ‘बिग बॉस’द्वारे बदलही होऊ शकतात पण आत्तापर्यंत या शोसाठी ही विजयी रक्कम सांगितली जात आहे. त्याच वेळी, या शोचा ग्रँड फिनाले १९ जानेवारीच्या रात्री ‘कलर्स टीव्ही’ तसेच ‘जिओ सिनेमा’वर पाहू शकाल. ग्रँड फिनालेची वेळ अद्याप समोर आलेली नाही. ‘बिग बॉस १७’चा फिनाले संध्याकाळी ५ ते ६ च्या दरम्यान सुरु झाला होता.
‘बिग बॉस १८’ चा विजेता म्हणून रजत दलालचे नाव पुढे येत आहे. कारण इतिहास असा आहे की रँकिंग चार्टमध्ये पहिल्या क्रमांकावर राहिलेल्या व्यक्तीनेच या शोचे विजेतेपद पटकावले आहे. तेजस्वी प्रकाशपासून एमसी स्टेन, मुन्नवर फारुकीपर्यंत सर्वांकडून हाच इतिहास रचला आहे. आणि आता रजत दलालच्या बाबतीतही तीच परिस्थिती आहे. सुरुवातीपासूनच तो क्रमवारीत पहिल्या दोन क्रमांकामध्ये आहे. मात्र, करणवीर मेहराही या शर्यतीत अव्वल असल्याचं पाहायला मिळत आहे.