गेल्या वर्षात बऱ्याच कलाकारांनी प्रेक्षकांना अनेक आनंदाच्या बातम्या दिल्या. काहींनी त्यांच्या लग्नाची खुशखबर तर काहींनी गाडी घेतल्याची बातमी तर काहींनी नवं घर घेतल्याची बातमी चाहत्यांसह शेअर केली आहे. अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्याने नव्या वर्षात नवं घर घेतलं असल्याची बातमी चाहत्यांसह शेअर केली आहे. प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओक याने नुकतंच नवीन घर घेतलं असल्याची खुशखबर चाहत्यांसह शेअर केली आहे. (Prasad Oak New Home)
आजवर प्रसादने त्याच्या भूमिकेसह अनेक चित्रपटांच्या दिग्दर्शनातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. अनेक सुपरहिट सिनेमे प्रसाद ओकच्या नावे आहेत. ‘धर्मवीर’ चित्रपटातील त्याची आनंद दिघे साहेबांची भूमिका विशेष गाजली. यानंतर ‘धर्मवीर २’ साठी तो पुन्हा एकदा सज्ज झालेला पाहायला मिळत आहे. ‘धर्मवीर २’ च्या चित्रीकरणाला त्याने सुरुवात केली असल्याचं पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांनीही त्याच्या या भूमिकेला प्रचंड प्रतिसाद दिलेला पाहायला मिळाला आहे.
यानंतर आता प्रसादने २०२४ या नव्या वर्षात पदार्पण करताच एक आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली आहे. प्रसादने आपल्या हक्काचं नवं घर घेतलं आहे.नव्यावर्षाच्या मुहूर्तावर त्याने त्याच्या नव्या घरात प्रवेश केला आहे. त्याच हे घर त्याने उत्तमरित्या सजवलेलं पाहायला मिळत आहे. ‘ओक ११०२ व ११०३’ असे २ फ्लॅट स्टाईलिश नावाच्या पाटीत पाहायला मिळत आहेत. या व्हिडीओमध्ये प्रसादबरोबर त्याची पत्नी मंजिरी, सार्थक व मयांक अशी २ मुले पाहायला मिळत आहेत.
प्रसादने ही इंस्टाग्राम पोस्ट त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. त्याची ही पोस्ट पाहून चाहतात्यांसह अनेक कलाकार मंडळींनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. प्रसादच्या या यशात त्याची पत्नी मंजिरी ओक हिचा खूप मोठा वाटा आहे. प्रसादच्या सुख दुःखात मंजिरी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते.