गुरूवार, जुलै 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आकर्षक रोषणाई, फुलांची सजावट अन्…; आमिर खानच्या घरी लगीनघाई, लेकीच्या लग्नासाठी अवाढव्य खर्च, व्हिडीओ समोर

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 2, 2024 | 9:56 am
in Entertainment
Reading Time: 4 mins read
google-news
bollywood actor aamir khan and shikhare houses decorated for ira nupur wedding video viral on social media

आकर्षक रोषणाई, फुलांची सजावट अन्…; आमिर खानच्या घरी लगीनघाई, लेकीच्या लग्नासाठी अवाढव्य खर्च, व्हिडीओ समोर

बॉलिवूड अभिनेता आमीर खानच्या घरी सध्या लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे. अभिनेत्याची मुलगी इरा खान बॉयफ्रेंड नुपूर शिखरेबरोबर लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. अशातच इरा व नुपूर यांच्या लग्नापुर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. इरा व नुपूर यांचा गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात इटली येथे साखरपुडा सोहळा संपन्न झाला. त्यानंतर आता त्यांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकताच त्यांच्या घरी महाराष्ट्रीयन पध्दतीने केळवण पार पडले. याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अशातच आता त्यांच्या लग्नानिमित्त घराला सजावट करण्यात आल्याचे काही खास क्षण समोर आले आहेत. ( (Ira khan and nupur Shikhare Wedding)

इरा व नुपूर यांच्या लग्नानिमित्त दोघांच्याही घरी आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. गेल्या एक महिन्यापासून दोन्ही कुटुंबांकडून लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली असून याचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर येत आहेत. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये आमिर खानचे घर दिव्यांनी झगमगताना दिसत आहे. तसेच त्याच्या घराला आकर्षण सजावट, रंगरंगोटी व रोषणाई करण्यात आली आहे. आमीर खानशिवाय त्याची पूर्वपत्नी रीना दत्ताच्या घरीही लाडक्या लेकीच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली असल्याचे दिसून येत आहे. रीनाचेही घर गुलाबी व पांढर्‍या दिव्यांनी उजळून निघाले आहे.

View this post on Instagram

A post shared by Varinder Chawla (@varindertchawla)

आणखी वाचा – ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ व ‘ थ्री इडियट्स’साठी शाहरुख खान होता पहिली पसंती पण…; अभिनेत्यानेच केला खुलासा

त्याचबरोबर नुपूर शिखरेनेदेखील त्याच्या घराची एक झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. नुकताच नुपूरने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये त्याच्या घराला फुलांची सजावट असलेली पाहायला मिळत आहे. तसेच व्हिडीओमध्ये पुढे त्याची आई त्याला टिळा लावत त्याचे औक्षणदेखील करताना दिसत आहे. नूपुरने त्याच्या कुटुंबियांचे काही खास फोटोदेखील शेअर केले आहेत. याशिवाय ते महाराष्ट्रीयन रितीरिवाजानुसार लग्नाआधीचे काही विधी करतानाही दिसून आले. अशातच शिखरे व खान हे दोन्ही कुटुंबीय त्यांच्या मुलांच्या लग्नासाठी आतुर असून त्यांनी लग्नासाठी जय्यत तयारी केली असल्याचे या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Popeye ⚓ (@nupur_popeye)

आणखी वाचा – ऋषी कपूर यांना नाना पाटेकरांच्या हातचा खायचा होता खीमा पाव पण…; अभिनेत्याने सांगितला ‘तो’ भावुक प्रसंग

दरम्यान, काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खान कुटुंब इराच्या लग्नासाठी खूपच आनंदी आहेत. कारण ते या नवीन वर्षाची धमाकेदार सुरुवात लेकीच्या लग्नसोहळ्याने करणार आहेत. इरा व नुपूरचे लग्न ३ जानेवारी रोजी वांद्रे येथील ताज लँड्स एंड या आलिशान हॉटेलमध्ये होणार आहे. यानंतर ६ ते १० जानेवारी दरम्यान दोन रिसेप्शन पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. यापैकी एक रिसेप्शन दिल्ली येथे तर दुसरे रिसेप्शन जयपूरमध्ये होणार असल्याचे म्हटले जात आहे.

Tags: aamir khanbollywood newsentertainment newsira khanIra khan and nupur Shikhare Weddingira khan weddingnupur shikhare
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
kaylee hottle died
Entertainment

‘गॉडजिला वर्सेस कॉन्ग’ फेम अभिनेत्रीचा कार अपघातात मृत्यू, वडिलांप्रमाणे लेकीलाही ऐकू येत नव्हतं आणि…

जुलै 22, 2026 | 11:00 am
Naseeruddin Shah On CJP Protest
Entertainment

चेहऱ्यावर मास्क आणि हातात काठ्या; विद्यार्थ्यांवरील हिंसाचाराच्या विरोधात बॉलिवूड अभिनेता भडकला, म्हणाला, “गुंडांच्या हातून…”

जुलै 22, 2026 | 10:13 am
Savalyachi Janu Savali Team
Entertainment

‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेची टीम वारीत दंग, पारंपरिक वेशभूषेत पोहोचले विठूरायाच्या दर्शनाला

जुलै 21, 2026 | 12:39 pm
Next Post
Prasad Oak New Home

नववर्षाच्या सुरुवातीलाच प्रसाद ओकने दिली गुडन्यूज, नव्या घराचा व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.