शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“साडीत छान दिसते”, बोल्ड सीन व बिकिनी फोटोशूटवरुन ट्रोल करताच प्रिया बापट स्पष्टच बोलली, म्हणाली, “माझ्या बाबांनी…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 1, 2024 | 5:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Priya Bapat On Trolling

"साडीत छान दिसते", बोल्ड सीन व बिकिनी फोटोशूटवरुन ट्रोल करताच प्रिया बापट स्पष्टच बोलली, म्हणाली, "माझ्या बाबांनी…"

बरेचदा कलाकार मंडळींना अनेक गोष्टींमुळे ट्रोलिंगचा सामना हा करावा लागतो. विशेषतः महिला कलाकारांना बरेचदा बॉडी शेमिंगमुळे, तसेच कलाकारांच्या बिकिनी फोटोशूटमुळे बरेचदा ट्रोल केलं जात. ही कलाकार मंडळी कित्येकवेळा ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देताना दिसतात तर बरेचदा या ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करतात. अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने बिकिनी शूटवरुन होणाऱ्या ट्रोलिंगबाबत नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे. (Priya Bapat On Trolling)

अभिनेत्री प्रिया बापटने केलेल्या बिकिनी फोटोशूटवरुन ती बरेचदा नेटकऱ्यांच्या कचाट्यात अडकली आहे. अभिनेत्रीने नुकत्याच ‘आरपार’ या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सोशल मीडिया ट्रोलिंग, बिकिनी फोटोशूट व बोल्ड सीन व त्या बोल्ड सीन वरून वडिलांची आलेली प्रतिक्रिया या बाबत खुलेपणाने भाष्य केलं आहे. प्रिया बापटला ‘सिटी ऑफ ड्रीम्स’मधील बोल्ड सीनबाबत विचारलं असता ती म्हणाली, “त्या बोल्ड सीनपासून ते आता मी ऑस्ट्रेलियात बिकिनी घालून फोटोशूट केलं तेवढ्या काळात मला लोकांचे बरेच अनुभव आले. ‘आमच्या प्रियाने असं नाही करायचं’, ‘आमची प्रिया साडीतच छान दिसते’ अशा अनेक प्रतिक्रिया मला ऐकायला मिळाल्या. ‘सिटी ऑफ ड्रीम्स’च्या त्या बोल्ड सीननंतर तर मला लोकांचं प्रचंड ऐकायला लागलं होतं.

आणखी वाचा – “गेल्या दोन महिन्यांपासून…”, अमृता खानविलकरचा ‘या’ आजाराशी सामना, पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणाली, “आजारपणात…”

प्रिया पुढे म्हणाली, “आपण समाज म्हणून एखाद्या कलाकाराकडे कलाकार म्हणून पाहिलं पाहिजे. लोक मला आपलं समजतात, त्यांच्या घरातल्यासारखं समजतात ही खूप चांगली गोष्ट आहे.त्या लोकांना मी हेदेखील आवर्जून सांगेन की, माझ्या घरच्यांना या सगळ्याचा अजिबात त्रास होत नाही. माझं हे काम आहे ही गोष्ट त्यांनी समजून घेतली आहे. माझे आई-बाबा, माझा नवरा यांना काहीच अडचण नव्हती. त्या सगळ्यांनी माझ्या कामाचा एक भाग म्हणून या सगळ्या गोष्टी आनंदाने स्वीकारल्या आहेत”

“‘सिटी ऑफ ड्रीम्स’ प्रदर्शित झाल्यावर माझा तो सीन सगळीकडे व्हायरल होत होता. मला ज्या क्षणी ती क्लिप दिसली, तेव्हा मी सगळ्यात आधी बाबांना फोन केला त्यांना सगळी कल्पना दिली. तुम्हाला माझी लाज नाही ना वाटत? असंही मी त्यांना विचारलं. त्यावर माझ्या बाबांनी एका वाक्यात मला उत्तर दिलं. ते म्हणजे हा सगळा तुझ्या कामाचा एक भाग आहे. तू काम म्हणून हे स्वीकारलंस यात आम्हाला काहीच गैर वाटत नाही. तू दुर्लक्ष कर. विसरुन जा” असं प्रिया म्हणाली.

आणखी वाचा – स्मिता तांबेकडे राहण्यासाठी नव्हते घर, पुष्कर श्रोत्रीने केली होती मदत, स्वत: सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “हा दिवस मी आयुष्यात…”

ऑस्ट्रेलियातील बिकिनी शूटबद्दल प्रिया म्हणाली, “माझ्या वडिलांना त्या फोटोचा काहीच प्रॉब्लेम नव्हता. बॉलिवूड-हॉलिवूड चित्रपटातील कलाकारांच्या भूमिकांना तुम्ही पात्र म्हणून बघता आणि हेच काम तुमच्या मराठी मुलीने केलं तर संस्कृती आड का येते? एका मराठी मुलीने साकारलेल्या पात्राचा अभिमान तुम्हाला का वाटत नाही? कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचं हे आपल्या हातात असतं” असंही प्रियाने सांगितलं.

Tags: entertainmentmarathi actresspriya bapatpriya bapat on trollingpriya bapat troll
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
bollywood actor aamir khan and shikhare houses decorated for ira nupur wedding video viral on social media

आकर्षक रोषणाई, फुलांची सजावट अन्…; आमिर खानच्या घरी लगीनघाई, लेकीच्या लग्नासाठी अवाढव्य खर्च, व्हिडीओ समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.