स्टार प्रवाह वाहिनी वरील ‘आई कुठे काय करते?’ ही मालिका प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. मालिकेला इतके दिवस होऊनही उत्तम कथानकामुळे व कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे ही मालिका आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. अभिनेत्री रुपाली भोसले ही या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रिय झाली आहे. या मालिकेतील् तिच्या संजना या पात्रालादेखील मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळत आहे. अशातच २९ डिसेंबर रोजी रुपालीचा वाढदिवस होता आणि या मालिकेच्या सेटवर तिचा वाढदिवस साजरा करण्यात आला. (Rupali Bhosle Birthday On Aai Kuthe Kay Karte Serial Set)
डिसेंबर महिना सुरू झाल्यापासून रुपालीचे अनेक चाहते तिचा वाढदिवस साजरा करत असल्याचे दिसत आहे. याचे काही फोटो व व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. अशातच ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या सेटवरदेखील तिचा वाढदिवस साजरा करण्यात आला. याचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील कलाकार मंडळी अभिनेत्रीचा वाढदिवस साजरा करताना पाहायला मिळत आहेत. अभिनेत्रीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये मालिकेतील कलाकारांसह इंटर तंत्रज्ञ मंडळीही दिसत आहेत.
आणखी वाचा – आकर्षक रोषणाई, फुलांची सजावट अन्…; आमिर खानच्या घरी लगीनघाई, लेकीच्या लग्नासाठी अवाढव्य खर्च, व्हिडीओ समोर
हा खास व्हिडीओ शर करत रुपालीने या व्हिडीओखाली एक पोस्टदेखील लिहिली आहे. यात तिने असं म्हटलं आहे की, “धन्यवाद मित्रांनो… वाढदिवस संपला? तर नाही… ‘आई कुठे काय करते’च्या सेटवर आज मी माझा चौथा वाढदिवस साजरा केला. हा माझा चार वर्षांचा प्रवास आहे. संजना (मालिकेतील रुपालीचे पात्र), या सुंदर प्रवासासाठी धन्यवाद. मला संजना भूमिका साकारायला खूप आवडतं आणि मला यातून खूप आनंद मिळतो. संजनामध्ये मी आता मानसिक, शारीरिक व मानसिकरित्या गुंतून गेली आहे. संजना या पात्राचा प्रत्येक सीन पुसून टाकण्याचा मी प्रयत्न करते आणि जेव्हा मी नवीन सीन करते तेव्हा तो नवीन दृष्टीकोनातून करण्याचा प्रयत्न करते. मी हे पात्र साकारताना नेहमी माझं सर्वोत्तम देते. संजना माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.”
आणखी वाचा – ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ व ‘ थ्री इडियट्स’साठी शाहरुख खान होता पहिली पसंती पण…; अभिनेत्यानेच केला खुलासा
दरम्यान, रुपालीणे शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये मालिकेतील सगळेचजण मोठ्या आनंदात व उत्साहात तिचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहेत. नेटकऱ्यांनीही लाईक्स व कमेंट्स करत या व्हिडीओला चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच या व्हिडीओखाली तिला अनेक् चाहत्यांनी वाढदिवसानिमित्त उशिराने शुभेच्छासुद्धा दिल्या आहेत.