Actor Atul Parchure Passes Away : मराठी कलाविश्वातील लोकप्रिय व दिग्गज अभिनेते अतुल परचुरे यांचे वयाच्या ५७ व्या वर्षी निधन झाले. मराठी मनोरंजन विश्वामधून ही धक्कादायक घटना समोर येताच साऱ्यांना अश्रू अनावर झाले. त्यांच्या निधनाची बातमी कळताच संपूर्ण कलाविश्वाला धक्का बसला आहे. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी आणि आई असा परिवार आहे. अतुल यांना २०२२ साली यकृताचा कर्करोग असल्याचे निदान झालं होतं. कर्करोगावर मात करुन ते बाहेर आले होते. मराठी चित्रपटरसिकांनी तसेच परचुरे यांच्या चाहत्यांनी त्यांच्या जिद्दीचं कौतुक केलं.
अतुल परचुरे यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज १५ ऑक्टोबरला त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराअगोदर काही वेळ त्यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. कलाकारांसह राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी अतुल परचुरे यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. त्यानंतर मुंबईतील शिवाजी पार्क दादर हिंदू स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अतुल यांना अखेरचा निरोप देताना त्यांच्या कुटुंबीयांना तसेच कलाविश्वात कलाकारांनाही अश्रू अनावर झाले.
मराठी कलाविश्वात अतुल परचुरे यांचं अग्रगण्य स्थान आहे. अतुल यांच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये त्यांना अखेरचं पाहण्यासाठी कलाकारांनी गर्दी केली आहे. यावेळी सचिन खेडेकर, चंद्रकांत कुलकर्णी, सुबोध भावे, मंदार देवस्थळी, भारत गणेशपुरे, प्रदीप वेलणकर, अरुण कदम, विद्याधर जोशी, सविता मालपेकर, नेहा पेंडसे, सुप्रिया पाठारे ही कलाकार मंडळी उपस्थित आहेत.
आणखी वाचा – Atul Parchure Death : अतुल परचुरेंना अखेरचा निरोप देण्यासाठी राज ठाकरे यांची उपस्थिती, भावुक व्हिडीओ समोर
अतुल यांच्या अंतिम दर्शनावेळी निवेदिता सराफ, सुनील बर्वे, आदेश बांदेकर, संजय मोने, सविता मालपेकर, वंदना गुप्ते, दिशा दांडे, सुप्रिया पाठारे, रोहिणी हट्टंगडी या कलाकारांना अश्रू अनावर झाले. अतुल परचुरे हे अनेक दिवसांपासून कर्करोगाशी झुंजत होते. पण काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती पुन्हा खालावली. पण आता अतुल परचुरे यांनी जगाचा निरोप घेतला असून एक हरहुन्नरी कलाकार मराठी सिनेसृष्टीने गमावला असल्याची भावना प्रत्येकाची आहे