तरुण असणं किंवा नसणं हे आपल्या मानण्या न मानण्यावर अवलंबून आहे. तुम्ही वयाच्या ७० व्या वर्षीही तरुण राहू शकता, त्यासाठी केवळ तुमची इच्छाशक्ती हवी. गेली २ ते ३ दशकं गाजवणारी अनेक बॉलिवूड कलाकार आजही तितकीच तरुण आणि चार्मिंग दिसतात. अर्थात त्यासाठी व्यवस्थित डाएट, जीम या गोष्टी आहेतच. अनेक कलाकार त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात आजही तरुणच दिसतात. कलाकार सदैव तरुण दिसण्याकरता अनेक मेहनत घेताना दिसतात. बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, जे त्यांच्या फिटनेससाठी ओळखले जातात. बॉलिवूडप्रमाणेच मराठीमध्येही असे काही कलाकार आहेत, जे त्यांच्या कठीण डाएटसाठी ओळखले जातात. त्यापैकी एक नाव म्हणजे अभिनेते अशोक शिंदे. (Ashok Shinde On Oil Consumption in Food)
नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये विविधांगी भूमिका साकारत अशोक शिंदे यांनी मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही आपलं नाव कमावलं आहे. अशोक शिंदे यांनी नायक, सहनायक आणि खलनायक अशा अनेक भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मराठी सिनेसृष्टीतील चिरतरुण अभिनेते म्हणून त्यांना ओळखले जाते. अभिनयाबरोबरच अशोक शिंदे हे त्यांच्या फिटनेससाठी ओळखले जातात आणि त्यांचा हा फिटनेसचा फंडा नेमका काय आहे? याबद्दल त्यांनी ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.
याबद्दल बोलताना अशोक शिंदे असं म्हणाले की, “नायक म्हटलं की आणि लोक जर तुम्हाला पैसे देऊन बघायला येत असतील तर त्यांना काहीतरी नवीन बघायला मिळालं पाहिजे. यासाठी कलाकार म्हणून तुमची तब्येत आणि तुमचं दिसणं महत्त्वाचे आहे. लोकांना नवल वाटतं पण आता त्यांच्यामध्ये थोडीफार जागरुकता आली आहे. पण मी खाण्यातल्या प्रत्येक गोष्टीत तेल न वापरता पाण्यातलीच खातो. उदाहरण द्यायचे झाल्यास, मी स्वतः पाण्यातली डाळ खातो. पाण्यातलं ऑम्लेट बनवतो, पाण्यातली भुर्जी बनवतो, पाण्यातच भाज्या बनवतो”.
आणखी वाचा – Video : नातवाबरोबर स्वतःही लहान झाले अरुण कदम, दोघांचा एकत्रित भन्नाट डान्स, क्युट व्हिडीओ तुफान व्हायरल
यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “कधी मला बटाटा वडा खायची इच्छा झाली तर मी आमच्या इथल्या काही लोकप्रिय वडापाव वाले आहेत, जोशी वडेवाले वगैरे… त्यांच्याकडे जातो आणि त्यांना म्हणतो चार वडे द्या आणि त्या वड्यांच्या आतलं सारण म्हणजेच ती भाजी घेतो. ती मी घरी घेऊन येतो आणि त्यांना ओव्हन मध्ये ठेवून दहा मिनिटे गरम झाल्यावर मग ते खातो. आता यासाठी तुम्हाला काही कष्ट घ्यावे लागतात”.