आपल्या विनोदाने सर्वांना पोट धरुन हसायला लावणारा अभिनेता म्हणजे अंशुमन विचारे. ‘फु बाई फु’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘कानामागून आली’ ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ यांसारख्या अनेक या विनोदी शोमध्ये काम करत त्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. तसेच ‘शिनमा’, ‘पोस्टर बॉयज’ सारख्या अनेक चित्रपटांतदेखील त्याने काम केले आहे. सोनी मराठी वरील ‘सिंगिंग स्टार’ या गाण्याच्या शोमध्येही तो सहभागी झाला होता. अभिनय, गायनसारख्या कलांमध्ये रमणारा अंशुमन सोशल मीडियावरदेखील तितकाच सक्रिय असतो. आपले अनेक फोटो व लेकीबरोबरचे विनोदी व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. अशातच त्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. (Anshuman Vichare On Instagram)
सामान्य माणूस असो किंवा एखादं प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व, स्वतःचं घर घेणं हे प्रत्येकाचंच स्वप्न असत. आपल्या मेहनतीने, कष्टाने प्रत्येकजण आपलं हे स्वप्न पूर्ण करत असतो. हेच स्वप्न अंशुमननेही पाहिलं आणि त्या स्वप्नांची आता पूर्तता होत आहे. अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर करत त्याच्या होऊ घातलेल्या नवीन घराची खास झलक दाखवली आहे. अंशुमनने त्याचं स्वतः च नवीन घर घेतलं असून सध्या त्या घराच्या बांधकामाचे काम चालू आहे. याच बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी अंशुमन व त्याची पत्नी पल्लवी यांनी हजेरी लावली आणि तिथली खास झलक त्यांनी सोशल मीडियावर चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.
आणखी वाचा – “आम्ही लग्न करण्याचा प्लॅन…”, पूजा सावंतने केला लग्नाच्या तारखेबाबत खुलासा, म्हणाली, “दोघांचे कुटुंब…”
हा खास व्हिडीओ शेअर करत त्याने याखाली “लवकरच. नवीन घर. खूप वाट पाहत आहोत” असं म्हटलं आहे. त्याच्या या व्हिडीओला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे. तसेच या व्हिडीओखाली नेटकऱ्यांनी कमेंट्सद्वारे अभिनेत्याला शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांत मराठीतील आंबेक कलाकारांनी नवीन घर घेत त्यांची स्वप्नपूर्ती केली आहे. त्यांच्यात आता अंशुमनचीही भार पडली आहे.
आणखी वाचा – सदाशिव अमरापुरकर यांच्या घराला आग, एक जण जखमी, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश, अन्…
दरम्यान अंशुमनच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर तो सध्या रंगभूमीवर ‘राजू बन गया zentelman’ नावाचे नाटक करत आहे. गेले काही दिवस तो चित्रपट, मालिका किंवा विनोदी शोमधून दिसला नाही त्यामुळे त्याचे चाहते त्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. तसेच त्याचे हे नवीन घर कधी तयार होणार याची ही चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.